उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये हेलीकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. बिघाड झालेले हेलीकॉप्टर उचलून नेत असताना हा अपघात झाला. हवेतच दोर तुटल्याने हा अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. लिंचोली येथील मंदाकिनी नदीजवळ हे हेलीकॉप्टर कोसळले.
एका खासगी कंपनीच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला होता. हे हेलीकॉप्टर घटनास्थळी दुरुस्त करणे शक्य नसल्याचे हेलीकॉप्टरला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे उत्तराखंडधील केदारनाथ येथून गौचरला हे हेलीकॉप्टर दुरुस्तीसाठी उचलून नेले जात होते. बिघाड झालेले हेलिकॉप्टर दोरखंडाने बांधून MI-17 या हेलिकॉप्टरने उचलून नेले जात होते. या दरम्यान आज शनिवार, ३१ ऑगस्ट रोजी सकाळी हवेत असतानाचं हेलीकॉप्टरला बांधलेला दोर तुटला आणि हेलीकॉप्टर खाली कोसळले. हे हेलिकॉप्टर लिंचोली येथील मंदाकिनी नदीजवळ कोसळले. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.
VIDEO | Uttarakhand: A defective helicopter, which was being air lifted from #Kedarnath by another chopper, accidentally fell from mid-air as the towing rope snapped, earlier today.#UttarakhandNews
(Source: Third Party) pic.twitter.com/yYo9nCXRIw
— Press Trust of India (@PTI_News) August 31, 2024
“आज सकाळी राज्य आपत्ती निवारण निधी (एसडीआरएफ) बचाव पथकाला लिंचोली येथील पोलिसांमार्फत या घटनेची माहिती मिळाली. एका खासगी कंपनीचे बिघाड झालेले हेलिकॉप्टर दुसऱ्या एका हेलिकॉप्टरद्वारे श्री केदारनाथ हेलिपॅड येथून गोचर हेलिपॅडकडे उचलून नेले जात असताना लिंचोली येथील नदीत कोसळले. एसडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही,” असे एएनआयने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, हवेतून कोसळणाऱ्या हेलिकॉप्टरचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
हे ही वाचा:
कानाच्या शस्त्रक्रियेसाठी भूल दिल्यानंतर महिला पोलिसाचा मृत्यू?
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४: नेमबाज मनीष नरवालने रौप्य पदकावर कोरले नाव !
पॅरालिम्पिकमध्ये नेमबाज मोनाची कांस्य पदकाची कमाई
हेलिकॉप्टर याआधी केदारनाथ मंदिराकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी सेवा देत होते. केदारनाथकडे जाणाऱ्या ट्रेक मार्गावर मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे ३१ जुलैपासून केदारनाथला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या संख्येत मोठी घट झाली आहे. ऑगस्टमध्ये ट्रेक मार्गावरील वाहतूक थांबल्याने यात्रेकरू हेलिकॉप्टरने मंदिराकडे जात असल्याची माहिती आहे.