…आणि अनंत अंबानींनी कोंबड्याच दुप्पट किमतीने विकत घेतल्या!

१४०किमीच्या पायी प्रवासातली घटना

…आणि अनंत अंबानींनी कोंबड्याच दुप्पट किमतीने विकत घेतल्या!

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानी यांचा ‘जामनगर ते द्वारका’ असा पायी प्रवास सुरु आहे. ‘जामनगर ते द्वारका’ असे एकूण १४० किमी अंतर आहे. आजचा त्यांचा (१ एप्रिल) पाचवा दिवस आहे. आतापर्यंत त्यांनी ५० किलोमीटर अंतर कापून सोनार्डी गावातील पाटिया येथे पोहोचले आहेत. दरम्यान, अनंत अंबानी यांनी आपल्या प्रवासा दरम्यान केलेल्या एका गोष्टीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. कत्तलखान्यात नेल्या जाणाऱ्या २५० कोंबड्यांना जीवनदान देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांनी दुप्पट किंमत देऊन सर्व कोंबड्या विकत घेतल्या आणि हातामध्ये एक कोंबडी घेवून काही अंतर प्रवासही केला.

अनंत अंबानी यांचा १० एप्रिल रोजी वाढदिवस आहे आणि ते आपला ३० वा वाढदिवस द्वारकेत साजरा करणार आहेत. यासाठी त्यांनी ‘जामनगर ते द्वारका’ असा पायी प्रवास करण्याचे ठरवले आहे. यासाठी त्यांनी २८ मार्च रोजी जामनगरमधील मोती खावडी येथून आपला प्रवास सुरू केला. वाहतूक आणि सुरक्षेमुळे लोकांना अडचणी येऊ नयेत म्हणून अनंत अंबानी रात्रीचा प्रवास करतात.

याच प्रवासादरम्यान, कोंबड्यांनी भरलेली एक गाडी त्यांच्या जवळून जात होती, ज्यामध्ये २५० कोंबड्या होत्या. या सर्व कोंबड्या कत्तलखान्यात नेल्या जात होत्या. अनंत अंबानी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ती गाडी थांबवण्यास सांगितली.  अनंत अंबानी यांनी गाडी मालक आणि ड्रायव्हरशी बोलून गाडीतील सर्व कोंबड्या दुप्पट किमतीत विकत घेतल्या. या सर्व कोंबड्यांचा सांभाळ करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी जय द्वारकाधीशचा नाराही दिला.

हे ही वाचा : 

टायगर मेमनची संपत्ती केंद्र सरकार जप्त करणार

अबब…फटाका फॅक्टरीला भीषण आग! काय घडलं बघा

वक्फवर चर्चा करण्यापेक्षा विरोधकांची पळापळ

वक्फ विधेयक सादर करण्यास राहिले अवघे काही तास!

दरम्यान, अनंत अंबानींनी घेतलेल्या या निर्णयामुळे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे. याचा व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

 

सांगलीत 3 लाख घुसखोर तर राज्यात किती आणि देशात किती ? | Amit Kale | Suresh Chavahanke |

Exit mobile version