पवईत झोपडपट्टी तोडताना पोलीस, पालिका अधिकाऱ्यांवर फेकले दगड!

संतप्त जमाव पोलिसांवर धावून गेला

पवईत झोपडपट्टी तोडताना पोलीस, पालिका अधिकाऱ्यांवर फेकले दगड!

पवईत अतिक्रमण पथकावर दगडफेक करण्यात आलेली आहे.झोपडपट्टीवर तोडक कारवाई सुरु असताना नागरिकांनी पोलीस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांवर दगडफेक करण्यात आलेली आहे.यामध्ये पोलिसांची चांगलीच पळापळ झालेली आहे.

मुंबईतल्या पवईतील जयभीम नगरातील झोपड पट्टीवर महापालिकेची कारवाई सुरु असताना जमावाने पथकावर दगडफेक केली आहे.अनधिकृत असलेल्या झोपडपट्टीवर पालिकेची कारवाई होत असताना ही घटना घडली.पोलीस आणि पालिकेच्या पथकावर संतप्त जमावाने दगडफेक केली.या दगडफेकीत पोलीस आणि पालिकेचे कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे.घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे.

हे ही वाचा:

रोहित शर्मा पाकिस्तानविरुद्ध खेळणार!

स्वप्नील सावरकर यांना ‘व्रतस्थ पत्रकारिता’ पुरस्कार

उत्तराखंडमध्ये बेपत्ता ट्रेकर्सच्या मृत्यूच्या संख्येत वाढ, आणखी ५ दगावले!

‘भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्सची तिसऱ्यांदा अवकाशात झेप’

पालिकेच्या जेसीबीने तोडकाम सुरु करत असताना जमावाने दगडफेक केली.मुंबई पोलीस, राज्य राखीव पोलीस दल, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक दलाचे कर्मचारी मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झालेले आहेत.दगडफेकीमुळे पोलिसांची पळापळ झाली असून पोलिसांच्या कारवाईवर आता सर्वांचे लक्ष आहे.या घटनेचे व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत.यामध्ये मोठा जमाव एकत्र होऊन पोलिसांवर दगडफेक करताना दिसत आहे.

अनधिकृत झोपडपट्टी असल्याने महापालिकेकडून हटवण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली होती. गेल्या वर्षांपासून हे लोक येथे राहत असल्याची माहिती आहे.पोलीस आता कशी कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

 

Exit mobile version