अमेरिकेतील भारतीय वंशाच्या डॉक्टरने अमेरिकेमध्ये हिंदू धर्माच्या प्रचार-प्रसारासाठी ४० लाख अमेरिकी डॉलर देण्याची घोषणा केली आहे.मिहिर मेघानी असे या डॉक्टरचे नाव आहे. हिंदू हा केवळ एक धर्म नाही तर ती एक जीवनशैली आहे, असे त्यांचे मत आहे.
त्यांनी सुमारे दोन दशकांपूर्वी त्याच्या काही मित्रांसोबत हिंदू अमेरिका फाऊंडेशनची स्थापना केली होती. त्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला पुढील हिंदूंच्या हितासाठी १५ लाख डॉलर देण्याची घोषणा केली होती. हे १५ लाख डॉलर मिळवल्यास पुढील दोन दशकांत ते ४० लाख डॉलरचे दान करतील. त्यामुळे हिंदू धर्मासाठी इतका मोठा निधी देणारे ते पहिले भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक होतील.
हे ही वाचा:
अंतरवली सराटीमधील दगडफेकीच्या घटनेतील मुख्य आरोपीला ठोकल्या बेड्या
बदनामीची धमकी देत माजी सैनिकाकडून पावणेचार लाख रुपये उकळले
चंद्रशेखर राव म्हणतात, जिंकलो तर मुस्लिम तरुणांसाठी खास आयटी पार्क उभारणार!
‘पंतप्रधान मोदी यांनी धीर दिल्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला’
‘मी आणि माझ्या पत्नीने आतापर्यंत हिंदू अमेरिकी फाऊंडेशनला १५ लाख डॉलरचा निधी दिला आहे. आम्ही गेल्या १५ वर्षांत हिंदू आणि भारतीय संघटनेला १० लाख अमेरिकी डॉलरपेक्षा अधिक मदतनिधी दिला आहे. पुढील आठ वर्षांत आम्ही भारत समर्थित आणि हिंदू संघटनांना १५ लाख डॉलर देण्याचा संकल्प करत आहोत,’ असे मिहीर यांनी जाहीर केले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात निधी देण्याचा मुख्य उद्देश हिंदू धर्माचा प्रचार व प्रसार करणे हा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मिहीर यांच्या उत्पन्नाचे साधन काय?
मिहीर यांची ना कोणती स्टार्टअप कंपनी आहे ना ते कोणता अन्य व्यवसाय करतात. ते पेशाने वैद्यकीय व्यावसायिक आहेत. त्यांची पत्नी एक फिटनेस इन्स्ट्रक्टर आणि ज्वेलरी डिझायनर आहे. त्यांच्याकडे कोणत्याही कंपनीचे समभागही नाहीत, असा त्यांचा दावा आहे. ते त्यांची सर्व संपत्ती हिंदू धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी देत आहेत, कारण ते त्यांचे कर्तव्य आहे, असे ते मानतात.