भारतातील हे आहे सर्वाधिक वाहतूक कोंडीचे शहर, काय आहे दिल्ली-मुंबईची स्थिती

टॉमटॉम डच लोकेशन टेक्नॉलॉजी तज्ज्ञ कंपनीचा अहवाल

भारतातील हे आहे सर्वाधिक वाहतूक कोंडीचे शहर, काय आहे दिल्ली-मुंबईची स्थिती

मुंबईतील गर्दी आणि वाहतूक बघून कोणीही म्हणेल की देशात सर्वात जास्त वाहतूक कोंडी मुंबईतच होत असेल. पण ते चुकीचे आहे. सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या शहरांमध्ये मुंबई नाही. पुणे तर त्यानही नाही. देशात तर जाऊ द्या पण संपूर्ण जगात सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या शहरांमध्ये भारतातीलच एका शहराचा क्रमांक लागला आहे.

वाहतूक कोंडीच्या सर्वाधिक त्रासाला बंगळूरकर कंटाळून गेले आहेत. वाहतूक कोंडीमुळे बंगळुरू शहरात १० किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी सरासरी २९ मिनिटे १० सेकंडच वेळ लागतो लागतो. वाहतूक कोंडी निर्देशांकात बेंगळुरू दुसर्‍या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षात जगात सर्वाधिक गर्दीच्या शहरांची यादी प्रसिद्ध झाली असून यामध्ये बंगळुरूने दुसरे स्थान मिळवले आहे. टॉमटॉम डच लोकेशन टेक्नॉलॉजी तज्ज्ञ कंपनीने ही यादी जाहीर केली आहे.

अहवालात लंडनला सर्वाधिक रहदारी असलेले शहर म्हणून वर्णन करण्यात आले आहे. लंडनमध्ये १० किमी अंतर कापण्यासाठी ३६ मिनिटे २० सेकंद लागले. डब्लिन हे आयर्लंडमधील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक गर्दीचे शहर होते. या यादीत दिल्ली ३४ व्या तर मुंबई शहर ४७ व्या स्थानावर आहे.

हे ही वाचा:

गिरीश बापट यांच्यामुळे कसब्याचा गड मजबूत

स्टिंग ऑपरेशननंतर बीसीसीआय निवड समिती अध्यक्षपदावरून चेतन शर्मा पायउतार

अधिक युक्तिवादाची गरज .. सत्तासंघर्षांवर आता २१ फेब्रुवारीला सुनावणी

आईच्या निधनामुळे संतापून इंग्रजांविरुद्ध त्या तरुणाने बंडाचे निशाण उभारले!

गेल्या वर्षात १५ ऑक्टोबर हा बेंगळुरू शहरातील सर्वात व्यस्त रहदारीचा दिवस होता. त्या दिवशी, शहराच्या मध्यभागी १० किलोमीटर अंतर कापण्यासाठी सरासरी प्रवास वेळ ३३ मिनिटे ५०सेकंद होता. टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सने सहा खंडांमधील ५६ देशांमधील ३८९ शहरांमधून माहिती गोळा केली होती. आश्चर्य म्हणजे बेंगळुरूमध्ये राहणाऱ्या लोकांनी सरासरी २६० तास (१० दिवस) ड्रायव्हिंग केले आहे आणि १३४ तास वाहतूक कोंडीत घालवले.

मेट्रो शहरात बंगळुरू सहाव्या क्रमांकावर

बोगोटा हे मेट्रो क्षेत्र श्रेणीतील सर्वात गर्दीचे शहर होते. त्यापाठोपाठ मनिला, सपोरो, लिमा, बेंगळुरू (५), मुंबई (६), नागोया, पुणे (८), टोकियो आणि बुखारेस्ट यांचा क्रमांक लागतो. मेट्रो सिटी एरिया श्रेणीमध्ये, बंगळुरूच्या प्रवाशांना १० किमी अंतर कापण्यासाठी २३ मिनिटे आणि ४०सेकंद लागले. शहरातील सरासरी वेग २२ किमी प्रतितास होता.

Exit mobile version