शुभमन गिलला ढापला?

शुभमन गिलचा झेल ग्रीनने पकडला होता पण चेंडूने मैदानाचा स्पर्श केल्याचा दावा

शुभमन गिलला ढापला?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या दिवसाच्या खेळात भारताला दुसऱ्या डावात हादरा बसला तो सलामीवीर शुभमन गिल १८ धावांवर बाद झाल्यामुळे. पण त्याचा हा बळी वादग्रस्त ठरला. स्कॉट बोलँडच्या गोलंदाजीवर त्याच्या बॅटला स्पर्श करत चेंडू स्लिपमध्ये गेला. तिथे कॅमेरून ग्रीनने डाव्या बाजूला झेपावत झेल एका हाताने घेतला पण तेव्हा चेंडू मैदानाला स्पर्श करत होता का, यावरून वाद निर्माण झाला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा या प्रकारामुळे संतापला होता.

 

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने हा प्रश्न उपस्थित केला. चेंडूचा कोणता भाग जमिनीला स्पर्श करत होता का? कारण त्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा पंचांशी हुज्जत घालत होता. साहजिकच पंचांनी बाद दिल्यामुळे शुभमन गिल निराश झाला होता.

हे ही वाचा:

‘लोकाग्रहास्तव सुप्रिया सुळे कार्याध्यक्षपदी’

मंदिरात नमाज पठण करणाऱ्या व्यक्तीला अटक

‘गदा’ कुणाकडे? भारत की ऑस्ट्रेलिया, भारताला हव्यात २८० धावा, ७ विकेट्स शिल्लक

शरद पवारांनी नेहमीप्रमाणे अजित पवारांना डावललं?

पॉन्टिंग म्हणाला की, जेव्हा झेल पकडला गेला तेव्हा चेंडू जमिनीपासून वर होता पण तेव्हा झेल पूर्ण झालेला नव्हता नंतर हात खाली आला आणि चेंडूने जमिनीला स्पर्श केल्यासारखे दिसत होते. तरीही तिसऱ्या पंचांनी शुभमनला बाद दिले.
कुमार संगकारा यानेही पंचांच्या या निर्णयाशी असहमती दर्शविली. जर चेंडूला जमिनीचा आधार मिळत असेल तर पंचांनी नाबाद द्यायला हवे. रवी शास्त्री म्हणाले की, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षकाची बोटे असली तरी झेल पूर्ण झाला तेव्हा चेंडू जमिनीला स्पर्श करत होता.

Exit mobile version