आयपीएल २०२४ च्या हंगामाला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. आयपीएलची पहिली लढत महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाशी होणार आहे. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. पण या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग आणि प्रसारण तुम्ही कधी, कुठे आणि कसे पाहू शकाल?
लाईव्ह स्ट्रीमिंग आणि ब्रॉडकास्ट कधी, कुठे?
आयपीएल २०२४ हंगामातील सामन्यांचे थेट प्रक्षेपण जिओ सिनेमावर पाहता येणार आहेत. जिओ सिनेमावर हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त इतर भाषांमध्ये सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे. यासाठी चाहत्यांना सब्सक्रिप्शन घ्यावे लागणार नाही, म्हणजेच पैसे मोजावे लागणार नाहीत. तर यंदाच्या मोसमात तुम्हाला स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सामन्यांना सुरुवात होणार आहे. याशिवाय सायंकाळी ७.३० वाजल्यापासून सामने खेळवले जाणार आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी
आयपीएल २०२४ हंगामातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे संघ आमने-सामने येणार आहेत. बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर २२ मार्च रोजी दोन्ही संघांमध्ये सामना रंगणार आहे. यंदाच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्ज महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात गतविजेता म्हणून खेळणार आहे. या संघाने गेल्या मोसमात शेवटच्या चेंडूवर गुजरात टायटन्सला पराभूत करून विजेतेपद पटकावले होते. आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्जने ५ वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला पहिल्या ट्रॉफीची अजूनही प्रतीक्षा आहे.
हेही वाचा :
हेमंत सोरेन यांच्या वहिनी सीता सोरेन भाजपात!
सिद्दीक कप्पननेच कपिल मिश्रा, परवेश वर्मा यांना मारण्यासाठी पीएफआय हिट पथकाला निर्देश दिले
राखी सावंत अडचणीत, समीर वानखेडेंकडून मानहानीचा खटला दाखल!
सिद्धू मूसेवाला याचे वडील म्हणतात, पंजाब सरकारकडून होतोय छळ
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला पहिल्या ट्रॉफीची प्रतीक्षा
आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने ३ वेळा फायनल गाठली आहे. पण त्यांना चॅम्पियन बनण्यात अपयश आले आहे. या संघाने आयपीएल २००९ च्या हंगामाच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती, पण अंतिम सामन्यात हैदराबादने पराभूत केले होते. यानंतर २०११ आणि २०१६ च्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने अंतिम फेरी गाठली होती. तेथेही त्यांना पराभव पत्करावा लागला होता.