27 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरविशेषरस्त्यांचे काँक्रिटीकरण तर झाले आता पाणी कसे मुरणार?

रस्त्यांचे काँक्रिटीकरण तर झाले आता पाणी कसे मुरणार?

Google News Follow

Related

शहरातील रस्त्यांवर कोट्यवधी खर्च करूनही दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांचे प्रमाण कमी होत नसल्याने महापालिकेने आता सहा मीटर रुंदीपर्यंतच्या सर्वच रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासाठी पुढील पाच वर्षांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. दरम्यान पालिकेने मुंबईत दरवर्षी १०० किलोमीटरहून अधिक रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र काँक्रिटीकरण केलेल्या या रस्त्यांवर पावसाचे पाणी मुरणार कसे, असा प्रश्न उपस्थित राहिला आहे.

डिसेंबर २०२० पर्यंत मुंबईत ७५० किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकारण पूर्ण झाले आहे. दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांची चाळण होते आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. पालिकेने रस्त्यांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. मुंबई महापलिका क्षेत्रात सुमारे २ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यात पाच हजार अंतर्गत रस्ते आहेत. त्यातील ३०० रस्त्यांची दुरुस्ती येत्या काळात होणार असून, एक हजाराच्या आसपास रस्त्यांची दुरुस्ती झाली आहे.

हे ही वाचा:

अनिल परबांच्या ‘त्या’ अनधिकृत कार्यालयावर पडणार हातोडा!

कधी मिळणार आहे, चिपळूणच्या पूरग्रस्तांना मदत?

साकीनाका घटनेची पुन्हा आठवण; जावयाने केली सासूची निघृण हत्या

तिला तब्बल दीड लाखाला पडली औषधे

आतापर्यंत ज्या मर्गांवर बेस्ट बस धावत होत्या त्या मार्गांवर प्रामुख्याने काँक्रिटीकरण करण्यात येत होते. मात्र, आता नियमात बदल करण्यात आला असून सहा मीटरवरील प्रत्येक रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे, असे पालिकेचे रस्ता विभागाचे प्रमुख अभियंता राजेंद्र तळकर यांनी सांगितले. काँक्रिटीकरणामुळे खड्ड्यांचे प्रमाण कमी होईल, असा दावा पालिकेने केला आहे.पालिकेतर्फे दरवर्षी १०० किलोमीटरहून अधिक रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाते. मुंबईच्या विकास आराखड्यात २०३४ मध्ये मुंबई शहरामध्ये पडणारा मुसळधार पाऊस आणि सतत वाढणारी वाहतूक याचा विचार करून रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणावर अधिक भर दिला आहे. त्यानुसार पालिकेने रस्ते बांधणीचे नियोजन केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा