पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे पैसे कुठे गुंतवतात?

प्रतिज्ञापत्रातून तपशील उघड

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे पैसे कुठे गुंतवतात?

ज्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्था १०व्या स्थानावरून पाचव्या क्रमांकावर पोहोचली असे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुदत ठेवी आणि पोस्ट ऑफिस योजनांसारख्या पारंपारिक गुंतवणूक साधनांवर विश्वास ठेवतात. सन २०२४ ची लोकसभा निवडणूक वाराणसी या मतदारसंघात लढण्यासाठी त्यांनी मंगळवारी दाखल केलेल्या त्यांच्या ताज्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात हे उघड झाले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या सन २०२४ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात असे दिसून आले आहे की, त्यांच्याकडे ३.०२ कोटी रुपयांची चल संपत्ती आणि ५२ हजार ९२० रुपये रोख आहेत. त्यांच्याकडे ना जमीन आहे, ना घर आहे ना गाडी आहे, असे त्यांच्या २०२४ च्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे. पंतप्रधान मोदी यांचे करपात्र उत्पन्न सन २०१८- १९ मध्ये ११ लाख रुपयांवरून सन २०२२- २३ मध्ये २३.५ लाख रुपये झाले.

बचतीसह गुंतवणुकीचा प्रश्न येतो तेव्हा, पंतप्रधान मोदी मुदत ठेवी आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांवर विश्वास ठेवतात. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये त्यांच्याकडे २.८५ कोटी रुपये मुदत ठेव पावत्या (एफडीआर) आहेत. पंतप्रधान मोदी यांची नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (एनएससी) मध्ये ९.१२ लाख रुपयांची गुंतवणूक आहे. एनएससीमधून वार्षिक ७.७ टक्के वार्षिक व्याज मिळते, तसेच, कलम ८० सी अंतर्गत कर लाभ मिळतो. एनएससीचा लॉक-इन कालावधी पाच वर्षांचा आहे. तसेच, किमान एक हजार रुपये यात गुंतवणूक करता येऊ शकते. पंतप्रधान मोदी यांची मुदतठेवी आणि एनएससीमधील एकूण गुंतवणूक सुमारे तीन कोटी रुपये आहे. भारतात गुंतवणूक करण्यासाठी पंतप्रधान बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे लक्ष देत आहेत.

गेल्या वर्षी जूनमध्ये अमेरिकेमध्ये, त्यांनी अमेरिकन कॉर्पोरेट्सना ‘भारतात गुंतवणूक करण्याची हीच वेळ आहे’, असे सांगितले होते. त्यांच्या २०१९च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात ७.६१ लाख रुपयांच्या एसएससी आणि १.२८ कोटी रुपयांच्या मुदत ठेवींचाही उल्लेख आहे. मोदी यांच्या सन २०१९च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात एल अँड टी इन्फ्रास्ट्रक्चर बाँडमध्ये २० हजार रुपयांच्या गुंतवणुकीचा उल्लेख होता. परंतु २०२४च्या शपथपत्रात कोणत्याही बाँडमध्ये गुंतवणुकीचा उल्लेख नव्हता.

हे ही वाचा:

‘स्वाती मालीवाल हिच्या जीवाला धोका’

दिल्ली: प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरण्यासाठी चोरट्याचा २०० वेळा विमान प्रवास!

लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिदनी २०२१मध्ये दिली होती होर्डिंगला परवानगी

बुडत्या उबाठाला योगेंद्र आधार

पंतप्रधान मोदींचा मोबाईल नंबर व्हॉट्सऍपवर नाही

पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मंगळवारी सादर केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांचा मोबाइल क्रमांक आणि ईमेल आयडी जाहीर केला. हा मोबाइल क्रमांक मात्र व्हॉट्सऍपवर नाही. ट्र्कॉलर ऍपवरील मोबाईल नंबर ‘Pm Narendra Ji’ म्हणून नोंदणीकृत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात शेअर केलेला ईमेल आयडी narendramodi@narendramodi.in आहे. गेल्या निवडणुकीच्या शपथपत्रातही पीएम मोदींनी त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल पत्ता शेअर केला होता.

Exit mobile version