पाच लाख लशींच्या कुप्या गायब झाल्या तरी कुठे?

पाच लाख लशींच्या कुप्या गायब झाल्या तरी कुठे?

कोरोना लस राज्यात देण्यास सुरुवात झाल्यानंतर आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पाच लाख लशींच्या कुप्यांचा हिशोबच लागत नसल्यामुळे अनेक प्रश्नांना आता तोंड फुटत आहे. राज्यातील बोगस लसीकरणासाठी या कुप्यांचा वापर केला जात असल्याचा संशय आता व्यक्त होत आहे. मुख्य म्हणजे लस वापरानंतर लसकुप्या या वैद्यकीय कचरा या माध्यमातून विल्हेवाट लावण्यात येतात. परंतु राज्यामध्ये मात्र पाच लाख कुप्या कुठे गायब झाल्या याचा कुठलाच हिशोब नाही.

बोगस लसीकरणामुळे अनेक जीव धोक्यात येऊ शकतात, याची प्रशासनाला चांगलीच कल्पना आहे. असे असले तरी महापालिका प्रशासन गाफील कसे असा संतप्त सवाल आता नागरिकांकडूनच विचारला जात आहे. ऐन लसीकरण मोहीमेमध्ये अनेकदा खंड पडल्यामुळे नागरीक सध्या मिळेल तिथे लस घेण्याच्या मनःस्थितीत आहेत. हे असे भयंकर प्रकार म्हणजे जीवाशीच खेळ आहे असे म्हणायला हवे.

हे ही वाचा:

सहआयुक्त संखेंच्या बदलीमुळे अनधिकृत बांधकामांना अभय ?

कम्युनिस्ट उत्तर कोरियावर उपासमारीची वेळ

अविनाश भोसलेंना ईडीचे समन्स

पडळकरांवर झालेल्या हल्ल्यांनंतर भाजपा नेते आक्रमक

बोगस लसीकरणामुळे आता अनेक मुद्दे चर्चिले जाणार आहेत. मुख्य म्हणजे या कुप्या गेल्या कुठे याचा कुणालाच थांगपत्ताही नाही. त्यामुळेच आता घडलेल्या घटनेमुळे वैद्यकीय यंत्रणेला नव्या आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या बोगस लसीकरणाच्या माध्यमातून केवळ पाणी भरण्यात आल्याचे आता उघड झालेले आहे. त्यामुळेच आता या पाच लाख कुप्यांचा याकरता वापर करण्यात आला तर अशी भीती आता निर्माण झालेली आहे.

मुख्य गोष्ट म्हणजे, वैद्यकीय कचरा हा सामान्य कचऱ्याप्रमाणे उघड्यावर टाकला जात नाही. याकरिता एक ठराविक पद्धत अवलंबूनच याची विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे त्या नियमावली अंतर्गत तो कचरा जाळून नष्ट केला जातो. त्यामुळे अशा प्रकारे या पाच लाख लशींच्या कुप्या जाळल्यात का याचा शोध सुरु झालेला आहे.

Exit mobile version