25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषबारा वर्षांखालील मुलांना लस कधी मिळणार?

बारा वर्षांखालील मुलांना लस कधी मिळणार?

Google News Follow

Related

अदर पूनावाला यांनी सांगितली तारीख

सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी एक मोठी घोषणा केली आहे. येत्या ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सीरमची लहान मुलांसाठीची कोवोवॅक्स कोरोना लस लॉन्च होणार असल्याचं अदर पूनावाला यांनी म्हटलंय. नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे.

सीरम सध्या कोवावॅक्स कोरोना लशीवर संशोधन करत आहे. ही कोरोना प्रतिबंधक लस १२ वर्षांवरील मुलांसाठी विकसीत करण्यात येत आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ही लस भारतात लॉन्च केली जाऊ शकते. त्यामुळे भारतातल्या कोरोनाविरोधातल्या लढ्याला आणखी बळ मिळणार आहे. विशेष म्हणजे पुढच्या वर्षी मार्चपर्यंत १२ वर्षाखालील मुलांसाठीची कोरोना लस येऊ शकते असंही पूनावाला यांनी स्पष्ट केलं आहे.

सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांन आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये देशातली कोरोना स्थिती आणि लसीकरणाबाबत चर्चा झाली. अमित शाहांच्या भेटीनंतर ही मोठी घोषणा केली.

हे ही वाचा:

जम्मू- काश्मिरबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

कोविडची होणार हार, लसीकरण ५० कोटी पार

आदर पुनावाला म्हणून भेटले आरोग्यमंत्र्यांना…

आपात्कालिन वापरासाठी जॉन्सन अँड जॉन्सनकडून देखील अर्ज

सीरम इन्स्टिट्युटकडून २ ते १७ वर्षे वयोगटातल्या मुलांवर कोरोना लसीची चाचणी सुरू असल्याची माहिती पूनावाला यांनी दिली. कोवोवॅक्स लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातली चाचणीसाठी काही शर्थींसह परवानगी देण्याची मागणी सीरम इन्स्टिट्युटे केली आहे. या चाचणीमध्ये देशातल्या १० शहरांमधली ९२० मुलं सहभागी होणार आहेत. ज्यात २ ते ११ वर्षे आणि १२ ते १७ वर्षे अशा दोन वयोगटातली प्रत्येकी ४६० मुलं आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा