केंद्र सरकारने आदेश देऊनही हिंदी भाषेमध्ये ‘ळ’ वापरण्याबद्दल फारशी हालचाल झालेली दिसून येत नाही. इंग्रजीमध्ये ‘ळ’ या अक्षराचा अचूक उच्चार होण्यासाठी प्रयत्न होत असताना हिंदी भाषेसाठी अंमलबजावणी झालेली नाही. मराठी भाषा अभ्यासक, मराठी भाषा तज्ज्ञ याबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. ‘ळ’ या अक्षराच्या आणि उच्चाराच्या वापरासाठी मराठी भाषिकांनी प्रयत्न करायला हवेत, असे मत अभ्यासक आणि तज्ज्ञांनी मांडले आहे.
हिंदीत ‘ळ’ चा वापर फारसा होत नसल्याचे भाषा अभ्यासक निर्मळ यांनी स्पष्ट केले आहे. एलआयसी आणि इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या दोन संस्थांनी हिंदीतील ‘ळ’ ची अंमलबजावणी सुरू केली आहे. रेल्वे मात्र या बाबतीत हटवादी असल्याचे त्यांनी सांगितले. ‘ळ’ हिंदीच्या वर्णमालेत घ्यावा, अशी मागणी १९४७ मध्ये झालेल्या हिंदी संमेलनात ठरावात करण्यात आली होती.
हे ही वाचा:
सिरीया, इराकमधून आलेल्या शेजाऱ्यांनी त्याला बनवले अतिरेकी
लोकप्रिय कलाकार घेतायत ८० हजार ते दीड लाख रोज
गर्भवती महिलेला तालिबान्यांनी कुटुंबासमोर घातल्या गोळ्या
आधुनिक हिंदीचा जन्म हा खडी बोली आणि हरियाणवी या पश्चिमी हिंदी बोलीमधून झाला, असे म्हटले जाते. या दोन्ही भाषांमध्ये ‘ळ’ आहे. हरियाणा आळे म्हणजेच हरियाणा वाले, मळाई म्हणजेच मलाई असे अनके शब्द या बोली भाषेत आहेत. हिंदी भाषिकांनी हे अमान्य केले, तरी आधुनिक हिंदीची जननी उर्दू असल्याने आणि हिंदीचा लहेजा उर्दू ठरवत असल्याने ‘ळ’ युक्त शब्द हिंदीत वापरत नाहीत, असे दिसते. त्यामुळेच ‘ळ’ ची अंमलबजावणी झालेली दिसत नाही.
सध्या इंग्रजीमध्ये ‘ळ’ च्या अंमलबजावणीवरून सुरू असलेल्या चर्चेबद्दल बोलताना निर्मळ यांनी सांगितले की इंग्रजीत केवळ L खाली रेषा देऊन भागणार नाही. सध्याच्या की- बोर्डवर त्या अक्षराची सुविधा नाही. ‘ळ’ या अक्षराच्या सुयोग्य वापरासाठी मराठी भाषिक कमी पडत असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले. ‘ळ’ च्या न वापराबाबत बँक आणि रेल्वे कडून हट्टीपणा केला जातो. यासाठी राज्य सरकारने आग्रही असायला हवे, असे मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी सांगितले. तसेच लोकमान्य टिळक यांच्या नावाचा ‘टिलक’ हा होणारा उच्चार टाळण्यासाठी येत्या काळात रेल्वे विरोधात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.