पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या उद्घाटन समारंभात भारतीय खेळाडूंच्या ड्रेस डिझाईनची बरीच चर्चा झाली होती. हे प्रसिद्ध डिझायनर तरुण ताहिलियानी यांनी डिझाइन केले आहे. मात्र, भारतातील अनेक क्रीडाप्रेमींना हा गणवेश आवडला नाही आणि त्यानंतर सोशल मीडियावर डिझायनरला प्रचंड ट्रोल केले गेले. यावर स्वतः डिझायनर तरुण ताहिलियानी यांनी प्रतिक्रिया दिली आणि खेळाडूंनी यावर लक्ष न देण्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, खेळाडूंनी गणवेशाच्या वादावर लक्ष न देता पदकांवर लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून देशासाठी जास्तीत जास्त पदके जिंकता येतील. तसेच ते म्हणाले की, खेळाडूंच्या गणवेशासाठी अनेक प्रकारचे डिझाइन स्केचेस सादर केले गेले होते, त्यानंतर हे डिझाइन निवडले गेले.
तरुण ताहिलियानी यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “मी माझ्या डिझाईनवर ठाम आहे, पॅरिसमध्ये त्याची खूप प्रशंसा झाली. प्रत्येक डिझायनरने भारतीय ऑलिम्पिक समितीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले. ते म्हणाले, “अखेरच्या क्षणी अनेक गोष्टी बदलल्या. मला विश्वास आहे की लोक त्यांचे मत व्यक्त करू शकतात. मला यात काही अडचण नाही, पण आम्ही जे काही केले त्याच्या पाठीशी मी उभा आहे. आम्हाला तिरंग्याच्या रंगात संघ हवा होता कारण बहुतेक देश त्यांच्या ध्वजांचे पालन करतात. त्यानुसार भारतीय खेळाडूंचा गणवेश तयार करण्यात आला. सर्व बाबींचा विचार करून गणवेश तयार करण्यात आल्याचे तरुण ताहिलियानी यांनी सांगितले.
हेही वाचा..
ऑलिम्पिक २०२४; नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंगला कांस्यपदक जिंकण्याची संधी !
केजरीवालांविरोधात सीबीआयकडून आरोपपत्र
अनिल देशमुखांनी समित कदमचे फडणवीसांसह फोटो दाखवले, आदित्य ठाकरेंचेही फोटो मिळाले
दिल्ली कोचिंग सेंटर मृत्यू प्रकरण : बुलडोजर कारवाईला सुरुवात
दरम्यान, भारताच्या गणवेशावर अनेकांनी सोशल मीडियावर टीका केली होती. भारतीय पुरुष खेळाडूंनी पांढरा कुर्ता पायजमा आणि एक जॅकेट घातले होते, ज्यावर भारतीय तिरंग्यासारखे तीन रंग होते. तर महिला खेळाडूंनी साडी परिधान केली होती.