पाकिस्तानव्याप्त काश्मीरचे निर्वासित मानवाधिकार कार्यकर्ते अमजद अयुब मिर्जा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना लक्ष्य केले आहे. ‘शरीफ हे पाकिस्तानव्याप्त काश्मीरबाबत खोटे बोलत आहेत. ते खोटे दावे करत आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये मानवीय संकट उद्भवले आहे. मात्र शरीफ यांना हे तथ्य स्वीकारायचे नाही,’ असा आरोप त्यांनी केला. रविवारी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर शाहबाझ शरीफ यांनी काश्मीर राग आळवला होता. या पार्श्वभूमीवर मानवाधिकार कार्यकर्त्यांनी त्यांना आरसा दाखवला आहे.
या कार्यकर्त्याने स्कॉटलंडवरून एका व्हिडीओ प्रदर्शित करून पाकच्या पंतप्रधानांवर टीका केली आहे. ‘पाकव्याप्त काश्मीरमधील माणसे मोठ्या प्रमाणावर भुकेने मरत आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना दर महिन्याला वेतनही मिळत नाही. निवृत्तीवेतनधारक एक वर्षापासून निवृत्तीवेतनाची प्रतीक्षा करत आहेत. विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांना त्यांच्या कामाचे पैसेही मिळालेले नाहीत. रुग्णालयात औषधेही नाहीत. रुग्णालयात कुत्रा चावल्यावर मिळणारी लसही उपलब्ध नाही.
हे ही वाचा:
निवडणुकीत दारुण पराभव दिसू लागल्याने ठाकरेंचं ईव्हीएमवर बोट!
गौतम गंभीरनंतर खासदार डॉ.हर्षवर्धन यांचा राजकारणाला रामराम!
कदाचित माझे शब्द मोदीजींना आवडले नसावेत!
बहुमतानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शाहबाज शरीफ
काश्मीरमधील ग्रामीण आरोग्यव्यवस्थाही कोलमडली आहे. शिक्षणप्रणालीही उद्ध्वस्त झाली आहे. जगभरात असा एकही देश नाही, जो पाकिस्तानमधील डिग्रीला मान्यता देतो. तेथील लोकांना आपली अवस्था सांगण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे,’ असेही त्यांनी सांगितले. आता ५ मार्च रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलनही केले जाणार आहे.मिर्जा यांनी सांगितले की, काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तानची अवस्था अधिक वाईट आहे. मात्र त्याची दखल घेण्याची पंतप्रधानांकडे हिंमत नाही. तेथील उपासमारीबद्दल बोलण्याची त्यांच्यात हिंमत नाही. येथील लोक गेली ७६ वर्षे पाकिस्तानी लष्कराच्या दबावामुळे त्रस्त आहेत, असेही मिर्झा म्हणाले.
काय बोलले शाहबाझ शरीफ?
शाहबाझ शरीफ यांनी रविवारी संसदेमध्ये ‘आपण सर्वजण एकजूट होऊन संसदेत काश्मिरी आणि पॅलिस्टिनींच्या स्वातंत्र्यासाठी प्रस्ताव संमत करूया,’ असे आवाहन केले होते.