यूपीच्या बहराइचमध्ये भाजपा महिला नेत्या अपर्णा यादव यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. खरंतर, ममतांनी मुख्यमंत्री योगींबद्दल टीका-टिप्पणी केली होती. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या टीकेला अपर्णा यादव यांनी सडेतोड उत्तर देत पलटवार केला आहे.
भाजपा महिला नेत्या आणि उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या उपाध्यक्षा अपर्णा ममता म्हणाल्या, त्या एका सन्माननीय पदावर आहेत, त्यांच्याकडून हे अपेक्षित नव्हते. मला असे वाटते की, जेव्हा एखाद्या व्यक्ती म्हातारा होत असतो, तेव्हा अशी वक्तव्ये करू लागतो. आपल्या मानसिक ताणामुळे आणि बंगालमधील परिस्थितीमुळे त्या मुख्यमंत्री योगींबद्दल अश्लील भाष्य करत आहेत. यापूर्वीही युपीच्या लोकांबद्दल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खूप वाईट बोलल्या आहेत. जनता हुशार आहे, ती सर्व काही पाहत आहे, असे अपर्णा ममता म्हणाल्या.
वास्तविक, मुख्यमंत्री योगी यांनी मुर्शिदाबाद हिंसाचारावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला होता. यानंतर, ममता बॅनर्जी यांनी योगी आदित्यनाथ यांच्या विधानाला प्रत्युत्तर दिले आणि महाकुंभातील चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. बुधवारी कोलकाता येथे इमामांच्या जाहीर सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, योगी मोठे बोलत आहेत. ते सर्वात मोठे भोगी (भौतिकवादी) आहेत.
त्या पुढे म्हणाल्या, महाकुंभात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. उत्तर प्रदेशातील चकमकीत अनेक लोक मारले गेले. मुख्यमंत्री योगी लोकांना रॅली काढूही देत नाहीत. पण पश्चिम बंगालमध्ये खूप स्वातंत्र्य आहे.
हे ही वाचा :
दिल्लीमध्ये ८ बांगलादेशी नागरिक ताब्यात
‘या’ कारणामुळे सुपरस्टार विजय विरोधात फतवा जारी!
रॉबर्ट वाड्रा म्हणाले, कितीही वेळा बोलावले तरी जाऊ
दरम्यान, मुर्शिदाबादमधील हिंसाचाराचा मुद्दा देशभरात जोर धरत आहे. या प्रकरणावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी टीकेचा सामना करत आहेत. हिंसाचारानंतर मोठ्या संख्येने पोलिस आणि प्रशासनाचे कर्मचारी तैनात आहेत आणि प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे.
#WATCH | Bahraich | BJP leader and Vice Chairperson of Uttar Pradesh Women's Commission, Aparna Yadav, says, "She is at a respectable position; this was not expected from her. I think when a person starts growing old, then they start saying such things. Because of her mental… pic.twitter.com/LbNrCqpJOv
— ANI (@ANI) April 16, 2025