जेव्हा न्यायमूर्ती चंद्रचूड एआय वकिलांशी संवाद साधतात…

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

जेव्हा न्यायमूर्ती चंद्रचूड एआय वकिलांशी संवाद साधतात…

देशाचे सरन्यायाधीश (CJI) न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी गुरुवार, ७ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रीय न्यायिक संग्रहालय आणि अभिलेखागाराचे उद्घाटन केले. न्यायाधीशांच्या जुन्या ग्रंथालयाचे संग्रहालयात रूपांतर करण्यात आले आहे. यावेळी सरन्यायाधीशांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वकिलाशी संवाद साधला. यावेळी चंद्रचूड यांनी एआय वकिलांना फाशीच्या शिक्षेसंबंधी प्रश्न विचारला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सर्वोच्च न्यायालयातील राष्ट्रीय न्यायिक संग्रहालय आणि अभिलेखागार दालनाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणी एआय वकील बनवण्यात आला आहे. थेट सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी या एआय वकीलांची परीक्षा घेत संविधानाशी संबंधित एक कायदेशीर प्रश्न विचारला.

भारतात माफीची शिक्षा घटनात्मक आहे का, असा प्रश्न सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला. यावर एआय वकिलांनी उत्तर दिले की, “हो. भारतात मृत्यूदंड घटनात्मक आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्धारित केल्यानुसार दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणांसाठी हे राखीव आहे जेथे गुन्हा अपवादात्मकरीत्या गंभीर आहे आणि अशा शिक्षेची हमी आहे,” असे उत्तर एआय वकिलाने दिले.

हे ही वाचा:

आधी आपल्या राष्ट्रीय नेत्याचं लग्न तर लावा!

ऍमेझोन, फ्लिपकार्टच्या विक्रेत्यांवर ईडीकडून कारवाई; २० ठिकाणी छापेमारी

मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही

काँग्रेसमधील बंडखोरांना सहा वर्षांसाठी टाटा, बाय-बाय

दरम्यान, नवीन संग्रहालय सर्वोच्च न्यायालयाचे राष्ट्रासाठी महत्त्व दर्शवते. शाळा आणि महाविद्यालयातील तरुण मुले, जे नागरिक वकील आणि न्यायाधीश नाहीत, त्यांनी येथे यावे आणि आम्ही कशाप्रकारे काम करतो, याची माहिती घ्यावी. जे काम सर्व न्यायाधीश आणि वकील करतात, त्याचा अनुभव त्यांना मिळेल आणि कायद्याच्या राज्याचे महत्त्व पटेल, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटले आहे.

Exit mobile version