31 C
Mumbai
Tuesday, December 17, 2024
घरविशेषथंडी वाजल्यामुळे पठ्ठ्याने थेट ट्रेनमध्येच शेकोटी पेटवली!

थंडी वाजल्यामुळे पठ्ठ्याने थेट ट्रेनमध्येच शेकोटी पेटवली!

घटनेचा व्हिडीओ रेल्वे मंत्र्यांना पाठवला

Google News Follow

Related

हिवाळ्याचा महिना सुरु असल्याने देशभरात थंडीचे प्रमाण वाढले आहे.थंडीपासून थोडा बचाव व्हावा म्हणून लोक शेकोटीचा आधार घेतात.परंतु काही लोकांनी थेट रेल्वेमध्येच शेकोटी पेटवली आहे.मेरठहून प्रयागराजला जाणाऱ्या संगम एक्सप्रेसमध्ये काही लोकांनी शेकोटी पेटवली आणि स्वतःला गरम करायला सुरुवात केली.शेकोटीमुळे एक्सप्रेसमधील डबा धुराने भरल्यामुळे एकच भीतीची परिस्थिती निर्माण झाली होती.

काही लोकांनी याचा व्हिडीओ बनवून रेल्वेमंत्र्यांना टॅग करत सोशल मिडीयावर पोस्ट केला.तेथून या घटनेची माहिती अधिकाऱ्यांना मिळताच घबराट पसरली.जीआरपीचे पथक रेल्वेपर्यंत पोहचले पण शेकोटी पेटवणारे लोक पसार झाले होते.पोलिसांच्या तपासात उघड झाले की, ट्रेनमध्ये शेतकरी नेते प्रवास करत होते, शेकोटी पेटवणारे हे लोक त्यांच्यासोबत होते.त्यांनीच ही शेकोटी पेटवली.

हे ही वाचा:

श्रीराममंदिराची प्रतिकृती निघाली मुंबई ते न्यू-जर्सी

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, १५ जणांचा मृत्यू!

शेअर बाजाराच्या निर्देशांकात लक्षणीय घट

नरेंद्र मोदींच्या गावात सापडले २८०० वर्षे जुने मानवी वसाहतीचे अवशेष

दरम्यान, पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.ही घटना औरेयाच्या फनफुडच्या पुढे कंचौसी स्टेशनजवळ घडली.रेल्वे कानपूर सेन्ट्रल स्टेशनवर पोहचल्यावर आरपीएफ आणि जीआरपीने ट्रेनची झडती घेतली.शेतकरी नेत्याचीही चौकशी करण्यात आली परंतु आरोपी सापडले नाहीत.ट्रेनला आग लावण्याचा कट रचल्याच्या संशयावरून या प्रकरणाची सुरु करण्यात आली आहे.त्यानंतर पोलिसांनी इतर प्रवाशांना याबाबत सावध केले आणि ट्रेनपुढे पाठवली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा