मंगळवारी केंद्र सरकारच्या मायगव्हइंडिया या ट्विटर हँडलने ‘व्हॉट्स राँग विथ इंडिया?’ (भारतात काय चाललेय तरी काय?) अशी फोटोळ देऊन भारताच्या उज्ज्वल कामगिरीचा दाखला देणारे चार वृत्तवाहिन्यांचे वृत्त प्रसिद्ध केले आणि अल्पावधीतच ते ट्रेन्ड झाले. काही परदेशी ट्विटर हँडलरनी भारतातील नकारात्मक बाबी सांगून भारताला लक्ष्य केले होते.
त्यांनी देशातील गरिबी, वाहतूककोंडी, भ्रष्टाचार, ठिकठिकाणी दिसणारे भिकारी आदी जगभरातील सर्व देशांमध्ये दिसणारी परिस्थिती केवळ भारतातच आहे, अशा प्रकारे भाष्य करून गेल्या दहा वर्षांतील भारतातील सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले होते. मात्र त्याला भारत सरकारने आणि भारतीय सोशल मीडिया वापरकर्त्यांनी सडेतोड उत्तर दिले. त्यात भारताने अतिदारिद्र्य संपुष्टात आणण्याची कामगिरी केल्यापासून ते चंद्राच्या दक्षिण धृवावर यशस्वी पाऊल टाकणारा पहिला देश, वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीप्रमुखाने केलेले कौतुक आणि डिजिटल पायाभूत सुविधा उभरण्यात अन्य राष्ट्रांनी ठेवलेला भारताचा आदर्श आदी वृत्तांचा दाखला देऊन या ट्विटर हँडलरची तोंडे बंद केली.
हे ही वाचा:
‘मिसाइल राणी’; अग्नि-५ क्षेपणास्त्रामागील डीआरडीओची ताकद!
मतदारांशी संपर्क साधण्यात राहुल गांधींकडून चूक
रशियाचे दिवंगत नेते नॅव्हल्नी यांच्या सहकाऱ्यावर हातोड्याने हल्ला
खट्टर यांचे निकटवर्तीय ते हरयाणाचे मुख्यमंत्री
‘व्हॉट्स राँग विथ इंडिया’ हा हॅशटॅग पहिल्यांदा कोणी सुरू केला, हे अज्ञात असले तरी काही सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या मते, हा ट्रेंड भारतातील रस्त्यांवरील अन्नपदार्थ विकणाऱ्यांना लक्ष्य करताना सुरू झाला. भारतातील रस्त्यांवरचे अन्नपदार्थ कसे खाण्यासाठी, आरोग्यासाठी असुरक्षित असतात, असे त्यात नमूद करण्यात आले होते. त्यानंतर अनेकांनी महिला सुरक्षा, गुन्हे, भ्रष्टाचार आदी मुद्द्यांवरून भारताला लक्ष्य केले आणि त्यावेळी ‘व्हॉट्स राँग विथ इंडिया?’ असे लिहून भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर भारतातील सोशल मीडिया वापरकर्त्यांनी लगेचच मैदानात उतरून पाश्चिमात्य आणि विकसित देशांना लक्ष्य केले, जिथे याच समस्या भेडसावत आहेत. तेव्हा भारतातील सोशल मीडिया वापरकर्त्यांनीही ‘व्हॉट्स राँग विथ इंडिया’ हाच हॅशटॅग वापरला होता. तसेच, त्यांनी कोणताही देश कसा परिपूर्ण नसतो आणि प्रत्येकाला त्यांच्या सामाजिक-आर्थिक परिस्थिती, ऐतिहासिक परंपरा आणि सामाजिक आचार-विचारांनी परिभाषित केलेल्या आव्हानांचा सामना करावा लागतो, हे स्पष्ट केले.
एका वापरकर्त्याने व्यसनाधीन होऊन रस्त्यांवर पडलेल्या बेघरांचा व्हिडीओ टाकला आहे. जो भारताबाहेर चित्रित झाला आहे. मात्र येथे त्याचे ठिकाण सांगण्यात आलेले नाही. तर, दुसऱ्याने परदेशातील मेट्रो रेल्वेत एक जण मूत्रविसर्जन करत असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. आता कोणत्याही प्रकारच्या दादागिरीला मग ती ऑनलाइन असो वा अन्य मार्गाने केलेली असो भारत कदापि खपवून घेणार नाही, हेच या पोस्टवरून दाखवून देण्यात आले आहे.