दुबईचे क्राउन प्रिन्स, संयुक्त अरब अमिरातचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री शेख हमदान बिन मोहम्मद अल मकतूम मंगळवारी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावर भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्या भेटीला भारत-संयुक्त अरब अमिरात संबंधांमध्ये एक मैलाचा दगड म्हणून वर्णन केले आहे.
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, क्राउन प्रिन्स यांचे औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देऊन स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री सुरेश गोपी विमानतळावर उपस्थित होते. दुबईच्या क्राउन प्रिन्स म्हणून शेख हमदान बिन मोहम्मद अल मकतूम यांचा हा पहिला अधिकृत भारत दौरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी त्यांच्याच्या सन्मानार्थ दुपारच्या जेवणाचे आयोजन करणार आहेत.
हेही वाचा..
कुणाल कामरा यांच्या याचिकेवर काय म्हणाले न्यायालय
संघप्रमुख मोहन भागवत लखनऊमध्ये दाखल
ट्रंप यांनी इराणसोबत थेट चर्चेची केली घोषणा
‘मुद्रा’मुळे स्वप्नातले कसे उतरले सत्यात
क्राउन प्रिन्स यांची परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबतही बैठक होणार आहे. दिल्ली दौऱ्यानंतर क्राउन प्रिन्स मुंबईला भेट देतील आणि दोन्ही देशांच्या प्रमुख व्यापारी नेत्यांसोबत एका व्यापार गोलमेज परिषदेत सहभागी होतील. या चर्चेमुळे भारत-संयुक्त अरब अमिरात आर्थिक आणि व्यापारी सहकार्य अधिक बळकट होईल.
परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “परंपरेनुसार, दुबईने भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यातील व्यापारी, सांस्कृतिक आणि लोकांमधील देवाण-घेवाणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महामहिम क्राउन प्रिन्स यांचा दौरा भारत-संयुक्त अरब अमिरात यांच्यातील व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करेल आणि दुबईसोबतचे आपले बहुआयामी संबंध अधिक सखोल करेल. या वर्षी २७-२९ जानेवारीदरम्यान परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त अरब अमिरातच्या दौऱ्यावर असताना क्राउन प्रिन्स यांना भारत भेटीचे पंतप्रधान मोदींचे निमंत्रण दिले होते.