स्वप्निल लोणकर या एमपीएससीच्या विद्यार्थ्याने नोकरीच्या समस्येमुळे आत्महत्या केल्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली पण बराच काळ लोटला तरी अद्याप या समस्येवर उत्तर सापडलेले नाही.
एमपीएससीने कोणत्या आणि किती पदांची भर्ती प्रक्रिया राबवावी याचे मागणीपत्र राज्य शासनाकडून एमपीएससीला देण्यात आलेले नाही. त्यामुळे ही पदभरती कशी करावी हा प्रश्न आहे. एमपीएससीने दोनवेळा राज्य शासनाकडे या पदभरतीसंदर्भात विचारणा केली पण शासनाकडून त्याला उत्तर मिळालेले नाही. सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान शासनाकडून मागणीपत्र येत असते पण ऑगस्ट आला तरी अद्याप हे मागणीपत्र मिळालेले नाही.
हे ही वाचा:
नाशिकमध्ये ‘नो हेल्मेट,नो पेट्रोल’
राज कुंद्राला ५ महिन्यांनी का अटक झाली?
‘तो’ विषय आमच्यासाठी संपलेला आहे
गणपती बाप्पा मोरया, ‘या’ गणपतीचं दर्शन घ्या
दरम्यान, अधिवेशनात ३१ जुलैपर्यंत रिक्त जागा भरू, अशी घोषणा अजित पवार यांनी विधानसभेत केली. बाहेर आल्यानंतर आपण महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या जागेविषयी बोलल्याचे अजित पवार म्हणाले होते. पण महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या जागांचा गुंताही अजून सुटलेला नाही. या सदस्यांसाठी तीन नावे राज्यपालांकडे पाठविण्यात आली आहेत, असे कळते.
लोणकरच्या आत्महत्येनंतर एमपीएससी भर्तीची प्रक्रिया वेगाने सुरू केली जाईल, असे म्हटले गेले होते. त्यासाठी ३१ जुलैपर्यंत तीन सदस्यांची पदेही भरली जातील असेही आश्वासन दिले गेले होते. पण अजूनही त्या प्रकरणाचे भिजत घोंगडे आहे.