27 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरविशेषदिवाळीत आलेलं सूर्यग्रहण कोणत्या शहरांमध्ये किती वाजता दिसेल?

दिवाळीत आलेलं सूर्यग्रहण कोणत्या शहरांमध्ये किती वाजता दिसेल?

Google News Follow

Related

यंदाची दिवाळी ही थोडी विशेष आहे कारण ऐन दिवाळीमध्येच म्हणजे आज, २५ ऑक्टोबर रोजी ग्रहण असणार आहे. भारतात सूर्यग्रहण सायंकाळी ४.२९ वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ६.०९ वाजता संपेल. २०२२ मधील हे पहिले सूर्यग्रहण आहे जे भारतात दिसणार आहे. तर या वर्षातले हे शेवटचे ग्रहण असणार आहे. शिवाय ऐन दिवाळीत महाराष्ट्रासह देशातील सर्व नागरिकांना एका महत्त्वाच्या खगोलीय घटनेचा साक्षीदार होता येणार आहे.

आज मंगळवारी खंडग्रास सूर्यग्रहण अनुभवता येणार आहे. भारतीयांना ४३ टक्के सूर्याचा भाग दिसू शकेल. शास्त्रज्ञांच्या मते, हे सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणं धोकादायक ठरू शकतं. भारतात यापुढील सूर्यग्रहण २ ऑगस्ट २०२७ रोजी दिसेल आणि ते पूर्ण सूर्यग्रहण असेल.

खगोलशास्त्रज्ञांच्या मते, देशातील उत्तर आणि पश्चिमेकडील भागांना हे सहज दिसेल. तर पूर्वेकडील भागात ग्रहण दिसणार नाही. देशातील दिल्ली, पश्चिम मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, जम्मू, गुजरात, श्रीनगर, लेह आणि लडाखमध्ये सूर्यग्रहण स्पष्ट अनुभवता येईल. तर तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मुंबई, ओडिशा, बिहार, छत्तीसगड, झारखंड, आणि बंगालमध्ये काही वेळ सूर्यग्रहण दिसेल. तसेच आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि नागालँड या भागात सूर्यग्रहण दिसणार नाही.

हे ही वाचा:

जो बायडन यांच्या उपस्थितीत व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीचा जल्लोष

म्यानमारमध्ये लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात ६० जणांचा मृत्यू

ब्रिटनची गडगडलेली अर्थव्यवस्था सावरायला भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधानपदी

जवान देशभक्तीपर गाणी गात असताना पंतप्रधान मोदींनी घेतला आनंद

राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये आजचं सूर्यग्रहण किती वाजता दिसेल?

  • मुंबई- प्रारंभ ४.४९, सूर्यास्त ६.०८
  • पुणे- प्रारंभ- ४.५१, सूर्यास्त- ६.३१
  • नाशिक- प्रारंभ- ४.४७, सूर्यास्त- ६.३१
  • नागपूर- प्रारंभ- ४.४९, सूर्यास्त- ६.२९
  • औरंगाबाद- प्रारंभ-४.४९, सूर्यास्त-६.३०
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा