राऊत यांची विधाने म्हणजे विरोधकांनी मोदींपुढे हात टेकल्याचा पुरावा!

संजय राऊत यांनी अग्रलेखात वापरलेली भाषा ही विरोधकांची अगतिकता दाखविणारी भाषा आहे.

राऊत यांची विधाने म्हणजे विरोधकांनी मोदींपुढे हात टेकल्याचा पुरावा!

नव्या संसद भवनाचे उद्घाटन होणार असताना विरोधकांचा मात्र त्यावर बहिष्कार आहे. जवळपास १९ विरोधी पक्षांनी या उद्घाटन कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या सगळ्या वातावरणात विरोधी पक्ष हे हतबल झाल्यासारखे वाटत आहेत आणि तसे वागतही आहेत. कुणाच्याही हस्ते उद्घाटन करा पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नको, ही त्यांची हतबलता सिद्ध करणारी भूमिका दिसत आहे. या विरोधकांचे एक प्रतिनिधी असलेले संजय राऊत यांनी अग्रलेखात हीच अगतिकता दाखविणारी भाषा वापरली आहे.

संजय राऊत यांनी म्हटले आहे की, संसद भवन भारतीय जनता पार्टीच्या मालकीचे नाही किंवा त्यांनी ते बनावट कागदपत्रे तयार करून विकत घेतलेले नाही. त्यांनी असेही म्हटले आहे की, या संसद भवनाच्या उद्घाटनासाठी जी कोनशिला बसविली जाईल त्यावर आपलेच नाव असावे हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आग्रह आहे आणि तेच त्यांचे धोरण आहे. संजय

राऊत यांनी असेही म्हटले आहे की, संसद भवनावर असलेली सिंहांची तीन तोंडे हे लोकशाहीचे प्रतीक आहे आणि त्या सिंहांनी गर्जना करू नये, रौद्र रूप धारण करू नये अशी मोदींची अपेक्षा आहे. संजय राऊत यांनी व्यक्त केलेल्या या मतांना कोणतेही ताळतंत्र नाही, त्यात कोणतेही तारतम्यही नाही. केवळ करायची म्हणून काही विधाने त्यांनी केलेली आहेत. मुळात नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होते आहे, ही या सगळ्या विरोधकांची पोटदुखी आहे हे आतासे स्पष्ट झालेले आहे. पण त्यापेक्षाही पुढे जाऊन आता नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आपण काहीही करू शकत नाही, आपण त्यांना निवडणुकीच्या मैदानात पराभूत करू शकत नाही, हे विरोधकांना पक्के ठाऊक झाले आहे. त्याचे निदर्शक म्हणजे संजय राऊत यांची ही विधाने आहेत.

हे ही वाचा:

पावसाची स्थिती यंदा सामान्य, ९६ टक्केचा अंदाज !

संसद भवनविरोधींची कृती बालिशपणाची!

ओम साईश्वर सेवा मंडळ, विद्यार्थी क्रीडा केंद्र अजिंक्य

कुनो नॅशनल पार्कमध्ये जन्मलेल्या चित्त्याच्या चार बछड्यांपैकी आता एक जिवंत

नरेंद्र मोदी यांनी संसदेचे उद्घाटन केल्यामुळे ते संसद भवन हे भाजपाच्या किंवा मोदींच्या मालकीचे होण्याचा प्रश्नच येत नाही. पण तारतम्यच बाळगायचे नाही, असे एकदा ठरविले की मग त्याला कोणताही धरबंद राहात नाही. ती अवस्था संजय राऊत यांच्यासह विरोधकांची झालेली आहे. संजय राऊत हे राज्यसभेचे अनेक वर्षे खासदार आहेत, त्यांना संसद भवनाच्या वर बसविण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रतिकात किती सिंह असतात याचे भान नाही असे कसे म्हणता येईल. पण तरीही ते तीन सिंह असा उल्लेख करतात. या राष्ट्रीय प्रतिकात चार सिंह असतात हे नागरिकशास्त्रातही म्हटलेले आहे पण ते संजय राऊत विसरतात.

कोनशिलेत मोदी यांचे नाव येईल यामुळे विरोधक बिथरतात हे अधिक हास्यास्पद वाटते. त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार म्हटल्यावर त्यांचे नाव येणार हे कुणीही सांगू शकेल पण तेही विरोधकांना मान्य नाही. या सगळ्या वक्तव्यांतून एकच गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे संजय राऊत यांच्यासह सगळे विरोधक हे वैफल्यग्रस्त झाले आहेत, निराशेच्या गर्तेत गेले आहेत. आपण आता मोदींना पराभूत करू शकत नाही, त्यांना निवडणुकीच्या मैदानात हरवू शकत नाही, याची खूणगाठ त्यांनी बांधलेली आहे. त्यामुळे आता त्यांच्या वक्तव्यांतून, कृतीतून ही हतबलता वारंवार दिसू लागली आहे. अन्यथा, विरोध दर्शविताना या पातळीपर्यंत येण्याची गरजच नसती. पण दिवसेंदिवस विरोधकांचा तोल सुटत चालला आहे.

एकीकडे मोदी हे राष्ट्रीयच नव्हेत तर आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार पावले टाकत आहेत. त्यामुळे विरोधकांचा धीर सुटत चालला आहे. त्यातून मग ही अशी वक्तव्ये असे निर्णय घेण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय राहिलेला नाही. अदानींशी असलेले संबंध वगैरे जोडण्याचा प्रयत्न झाला, आता या संसद भवनाच्या निमित्ताने आपली टिमकी वाजविण्यास विरोधकांनी सुरुवात केली आहे. पण भाजपाच्या विरोधात असलेल्या अनेक पक्षांनी किंवा नेत्यांनी या उद्घाटनाला पाठिंबाही दिलेला आहे. त्यामुळे उद्घाटन विरोधी पक्षांची गोची झाली आहे. थोडक्यात आगामी निवडणुकांमध्ये आपण याच संसद भवनात सत्ताधारी म्हणून येणे आता मुश्किल आहे, याची कुठेतरी विरोधकांना कुणकुण लागली आहे. त्यामुळे नैराश्यातून अशी विधाने त्यांच्याकडून येत असतील तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही.

Exit mobile version