ज्यांनी मृतांच्या टाळूवरचे लोणी खाल्लं त्यांना आरोग्य व्यवस्थेवर बोलण्याचा काय अधिकार?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

ज्यांनी मृतांच्या टाळूवरचे लोणी खाल्लं त्यांना आरोग्य व्यवस्थेवर बोलण्याचा काय अधिकार?

गुजरात, गुवाहाटीमध्ये जावून खर्च करायला सरकारकडे पैसै आहेत. गोव्यात जावून टेबलवर नाचायला त्यांच्याकडे पैसे आहेत. पण महाराष्ट्रातील रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केली होती. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलते होते. यावर भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेत प्रत्युत्तर देत म्हणाले,ज्यांनी मृतांच्या टाळूवरचे लोणी खाल्लं त्यांना आरोग्य व्यवस्थेवर बोलण्याचा काय अधिकार?.उद्धवजी कोविड काळातील घोटाळ्याबद्दल कधी बोलणार आहात का?अडीच वर्षे घरात बसून होते ते आज प्रश्न विचारतात हे म्हणजे उद्धवा अजब तुझा कारभार, असे ट्विट करत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

उद्धवजी जनाची नाही मनाची असेल तर कोविडमध्ये तुम्ही केलेली लूट आठवा, आक्सिजनविना महाराष्ट्रात तडफडणारे रुग्ण आठवा आणि राज्यात हे सुरू असताना तुम्ही मात्र टेंडर वाटण्यात मश्गूल होतात. उद्धवजी, तुम्ही तर मृतदेहासाठी वापरायच्या बॅगध्येही कट कमिशन सोडलं नव्हतं. मृतांच्या टाळूवरील लोणी खाल्लं, तुम्हाला आरोग्य व्यवस्थेवर बोलण्याचा अधिकार आहे का?

हे ही वाचा:

गतविजेत्या इंग्लंडची अपयशी सलामी

संजय सिंह यांची अटक वॉरंटशिवाय अथवा कारणाशिवाय नाही

खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्या धाकट्या भावाला समन्स

लेझर लाईटनंतर डीजेच्या आवाजामुळे पोलिसांना कानाचा त्रास

मुख्यमंत्री नागपुरात का गेले नाहीत? नांदेडला का गेले नाहीत? मुख्यमंत्री घरात का बसले? असं कोण विचारतंय तर ज्यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुकवर सरकार चालवलं ते उद्धव ठाकरे!

उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला तुम्ही नांदेडला जाणार का? तर त्यावर ते म्हणतात मी कशाला जाऊ? माझा पक्ष चोरलाय, माझं पद गेलं. म्हणजे पदावर असताना घरी बसायचं. पद गेल्यावरही घरात बसून पत्रकार परिषद घ्यायची आणि स्वतः काही करायचं नाही हे म्हणजे उद्धवा अजब तुझा कारभार!उद्धवजी , तुमचे सरकार असताना कोविड काळात जे घोटाळे झाले त्याबद्दल कधी तरी बोलणार की नाही?, असे ट्विट बावनकुळे यांनी केले आहे.

Exit mobile version