ऑलिंपिकला सुरूवात होणार…….पहा काय आहे वेळापत्रक!!!

ऑलिंपिकला सुरूवात होणार…….पहा काय आहे वेळापत्रक!!!

जपानमध्ये लवकरच ऑलिंपिक स्पर्धांना प्रारंभ होत आहे. कोविड काळामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या या स्पर्धा २३ जुलै ते ८ ऑगस्ट या दरम्यान होणार आहे. कोविडचा धोका टाळण्यासाठी खेळाडूंना बायोबबलमध्ये ठेवण्यात आले आहे. ऑलिंपिकच्या खेळांचे वेळापत्रक पुढे दिल्याप्रमाणे आहे.

नेमबाजी- नेमबाजीच्या पुरूष आणि महिला यांची पात्रता फेरी २३ जुलै रोजी होणार आहेत. मिश्र संघ फेऱ्या २४ जुलै रोजी होतील पुरूष संघ फेऱ्या २६ जुलै रोजी होणार आहेत. २७ ते ३० जुलै रोजी पदक स्पर्धा होणार आहेत. सर्व स्पर्धा पहाटे ५.३० ते ६ च्या दरम्यान चालू होतील

हे ही वाचा:

फोन टॅपिंग काँग्रेसच्याच काळात, मोदींच्या नव्हे

दिल्लीवर ड्रोन अटॅकचे संकट

मणिपूर काँग्रेस प्रदेशाध्यक्षच भाजपाच्या वाटेवर?

मुख्यमंत्री गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदे

जिम्नॅस्टिक्स- जिम्नॅस्टिक्सच्या प्राथमिक स्पर्धा २५ जुलै रोजी होणार आहेत. त्यानंतर २९ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान जिम्नॅस्टिक्सच्या अंतिम स्पर्धा होणार आहेत.

ट्रॅक्स आणि फिल्ड- हर्डल, रिले, थाळीफेक, लांबी उडी, भालाफेक, स्टीपलचेस इत्यादी सर्व खेळांच्या स्पर्धा ३० जुलै ते ७ ऑगस्ट या दरम्यान होणार आहेत. ऑगस्ट महिन्यात अंतिम सामने होणार आहेत.

बॅडमिंटन- बॅडमिंटनच्या स्पर्धांना २४ जुलै रोजी सुरूवात झाली. त्यानंतर विविध साखळी स्पर्धांनंतर २ ऑगस्ट रोजी पुरूष अंतिम सामना होणार आहे तर १ ऑगस्ट रोजी महिलांचा अंतिम सामना होणार आहे.

बॉक्सिंग- बॉक्सिंगच्या स्पर्धांना २३ जुलैपासून सुरूवात होणार आहे. विविध साखळी फेऱ्यांनंतर २८ जुलै ते ८ ऑगस्टमध्ये अंतिम सामने होणार आहेत.

घोडेस्वारी आणि तलवारबाजी- तलवारबाजीच्या स्पर्धा २६ जुलै रोजी तर ३० जुलै रोजी घोडेस्वारीच्या स्पर्धा होणार आहेत.

गोल्फ- गोल्फच्या स्पर्धांना २९ जुलै रोजी सुरूवात होणार आहे आणि साखळी स्पर्धांनंतर ७ ऑगस्ट रोजी होणार आहे.

हॉकी- हॉकीच्या स्पर्धांना २४ जुलै रोजी सुरूवात होईल आणि ६ ऑगस्टला महिलांचा अंतिम सामना होईल. ५ ऑगस्ट रोजी पुरूषांचा अंतिम सामना होणार आहे.

जुडो- जुडोच्या सर्व स्पर्धा २४, २५ जुलै रोजी होऊन जाणार आहेत.

शुटिंग- शुटिंगच्या स्पर्धांना २४ जुलै पासून सुरूवात होणार आहे, आणि २ ऑगस्ट रोजी स्पर्धा समाप्त होईल.

स्विमिंग- स्विमिंगच्या सर्व स्पर्धा २५ ते २९ जुलै या दरम्यान होणार आहेत

हे ही वाचा:

दिल्लीवर ड्रोन अटॅकचे संकट

मणिपूर काँग्रेस प्रदेशाध्यक्षच भाजपाच्या वाटेवर?

मुख्यमंत्री गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदे

३४ जणांचा जीव जाऊनही महानगरपालिका २ वर्षांपासून सुस्त

टेबल टेनिस, टेनिस, वेटलिफ्टिंग- टेबल टेनिस आणि टेनिस या दोन्ही खेळांच्या स्पर्धांना २४ जुलै रोजी सुरूवात होणार असून ३० जुलैला टेबल टेनिसचा अंतिम सामना होईल आणि १ ऑगस्ट रोजी टेनिसचा अंतिम सामना होईल. वेटलिफ्टिंगची संपूर्ण स्पर्धा २४ जुलै रोजीच पूर्ण होईल

रेस्लिंग- रेस्लिंगच्या स्पर्धांना ३ ऑगस्ट रोजी प्रारंभ होईल आणि ७ ऑगस्टला या स्पर्धांची सांगता होईल.

टोकियो ऑलिंपिक स्पर्धा सोनी टेन १ एचडी/एसडी, सोनी टेन २ एचडी/एसडी. या दोन वाहिन्यांबरोबरच दूरदर्शनवर देखील या स्पर्धा पाहता येणार आहेत.

Exit mobile version