गौराई माझी लाडाची लाडाची…

आज गौराईचे होणार आगमन आणि ४ सप्टेंबरला पूजन

गौराई माझी लाडाची लाडाची…

राज्यता घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन झालं असून आज, ३ सप्टेंबरला ज्येष्ठागौरीचे आगमन होणार आहे. तर ४ सप्टेंबर रोजी गौराईचं पूजन केलं जाणार आहे. तीन दिवस गौराईची सेवा करून उत्सव साजरा केला जाणार आहे.

भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन केले जाते. गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला होता, तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात. गौरीपूजनला काही ठिकाणी महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात. गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते, म्हणून यांना ‘ज्येष्ठागौरी’ असेही म्हटले जाते.

काय आहे गौरी पूजनाची कथा?

गौरीपूजनाची कथा एकदम चित्तवेधक आहे. शेकडो वर्षांपूर्वी असुर सुवासिनींना खूप त्रास देत असायचे. तेव्हा आपलं सौभाग्य जपण्यासाठी या सर्व स्त्रिया गौरीला शरण गेल्या होत्या. त्या स्त्रियांनी गौरीला असुरांचा नाश करण्यासाठी विनंती केली आणि गौरीनेही त्या स्त्रियांच्या मागणीचा मान ठेवत असुरांचा वध केला. तो दिवस होता भाद्रपद शुद्ध अष्टमीचा होता. तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात. गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते, म्हणून यांना ज्येष्ठागौरी असेही संबोधले जाते.

हे ही वाचा:

केजरीवाल विसरले ती लिकर पॉलिसी

नवे नौदल चिन्ह, मोदी आणि पिवळे इतिहासकार

‘एनआयए’ने दाऊद इब्राहिमची लायकीच काढली

‘राज साहेब आपल्या परखड वक्तृत्वाची महाराष्ट्र वाट पाहतोय’

वेगवेगळ्या भागात गौरी पूजन करण्याचे विविध प्रकार आहेत. काही भागांत गौरीच्या मुखवट्याची पूजा केली जाते. तर काही ठिकाणी पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा अकारा खडे आणतात आणि त्यांची पूजा करतात. या गौरीला ‘खड्यांच्या गौरी’ म्हटले जाते. काही ठिकाणी मडक्यांची उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे बसवले जातात. मडक्यांच्या या उतरंडीला साडी नेसवून तयार केले जाते आणि भक्तिभावाने पूजा केली जाते. विदर्भात महालक्ष्मींचे मुखवटे ठेवले जातात. विदर्भात खास करून गौरीला महालक्ष्मी म्हणतात. काही ठिकणी पूजेसाठी गहू, तांदूळच्या राशी मांडल्या जातात. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा सांगली या ठिकाणी तेरड्याची गौरी पाहायला मिळते. तेरड्याची रोपं मुळासकट उपटून आणली जातात. त्याला एकत्र करून गौरीचा मुखवटा लावून, त्या रोपांना साडी चोळी नेसवून तयार केले जाते. तर काही ठिकाणी मातीची मूर्ती बनवली जाते तर अनेक लोकं कागदावर देवीचे चित्र काढून त्याची पूजा करतात.

Exit mobile version