24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषकाय आहे पंतप्रधान मोदींच्या नव्या गाडीची खासियत?

काय आहे पंतप्रधान मोदींच्या नव्या गाडीची खासियत?

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक आहेत.  त्यामुळे त्यांची सुरक्षा ही देखील अत्यंत महत्वाची बाब आहे. अलीकडेच पंतप्रधानांच्या अधिकृत गाडीत बदल करण्यात आला आहे. या नव्या गाडीची किंमत १२ कोटींहून अधिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यातील सर्वात नवीन कार मर्सिडीज-मेबॅक S६५० गार्ड आहे. हे मॉडेल रेंज रोव्हर वोग आणि टोयोटा लँड क्रूझरचे अपग्रेडेड मॉडेल आहे. जे त्यांनी अलीकडेच लॉन्च केले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला ते रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना त्यांच्या भारत भेटीवर भेटले तेव्हा त्यांना हैदराबाद हाऊसमध्ये नवीन मेबॅक S६५० गार्डमध्ये पहिल्यांदा दिसले होते.

ही लक्झरी बुलेट-प्रूफ गाडी जी पंतप्रधानांच्या ताफ्यात जोडली गेली आहे. ते Mercedes-Maybach S650 Guard ची फेसलिफ्टेड आवृत्ती आहे, २०१९ मध्ये जागतिक स्तरावर या गाडीचे अनावरण केले गेले होते. ही सेडान अधिकृतपणे भारतात लॉन्च केली गेली नसली तरी, मर्सिडीज-बेंझने Maybach S600 लाँच केली आहे. ज्याची २०१६ मध्ये देशात किंमत १०.५० कोटी रुपये एवढी होती. पंतप्रधान मोदींच्या नवीन Mercedes-Maybach S650 Guard ची किंमत उघड करण्यात आलेली नाही. ती त्यामध्ये स्थापित केलेल्या पर्यायांवर अवलंबून असते. तथापि, यासाठी सुमारे १२ कोटी – १५ कोटी रुपये (अंदाजे कर नसलेले) खर्च अपेक्षित आहे.

हे ही वाचा:

दिनेश मोंगियाचा भाजपात प्रवेश

मोदी सरकारच्या योजनेला यश, चीनला डावलून इंटेल भारतात

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बारगळणार

सौरव गांगुलीला कोरोनाची लागण

पंतप्रधान मोदींच्या नवीन Maybach S650 Guard च्या प्रमुख वैशिष्ट्यांबद्दल बोलताना, याला VR10-स्तरीय संरक्षण मिळते, जे उत्पादन कारवर उपलब्ध असलेल्या रणगाड्यासामान संरक्षणाचे सर्वोच्च स्तर आहे. ही लक्झरी गाडी बंदुकीच्या गोळीचा सामना करू शकते आणि याला एक्सप्लोझिव्ह रेझिस्टंट व्हेईकल (ERV) २०१० रेटिंग देखील मिळाले आहे. याचा अर्थ असा आहे की ते फक्त दोन मीटरच्या अंतरावरून १५ किलो TNT स्फोटापासून प्रवाशांचे संरक्षण करू शकते. थेट स्फोटांपासून प्रवाशांचे रक्षण करण्यासाठी कारच्या खालच्या भागात जोरदार बख्तरबंद आहे. शिवाय, गॅसचा हल्ला झाल्यास त्याच्या केबिनला स्वतंत्र हवा पुरवठा होतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा