पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी IAF C-130 हर्क्युलस विमानातून महामार्ग हवाई पट्टीवर उतरल्यानंतर उत्तर प्रदेशातील ३४१ किमी लांबीच्या पूर्वांचल एक्सप्रेसवेचे (महामार्गाचे) उद्घाटन केले. यामुळे आता दिल्लीपासून बिहार बॉर्डरपर्यंत एक्सप्रेसवेने जात येणे शक्य होणार आहे. अर्थात संपूर्ण उत्तरप्रदेशात एक्सप्रेसवेचे जाळे पसरणार आहे.
हवाई पट्टीवर राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. द्रुतगती मार्गावर लढाऊ विमानांचे आपत्कालीन लँडिंग सुलभ करण्यासाठी ३.२ किमीची हवाई पट्टी बांधण्यात आली आहे.
#WATCH | Prime Minister Narendra Modi reaches Karwal Kheri on C-130 J Super Hercules aircraft to inaugurate the 341 Km long Purvanchal Expressway, shortly
(Source: DD) pic.twitter.com/dxQzlC476G
— ANI UP (@ANINewsUP) November 16, 2021
या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “ज्यांना उत्तर प्रदेशच्या क्षमतेवर, उत्तर प्रदेशातील लोकांच्या क्षमतेवर शंका आहे, त्यांनी आज सुलतानपूरला येऊन त्यांच्या क्षमतेचे साक्षीदार व्हावे. असा आधुनिक एक्स्प्रेस वे आता आला आहे जिथे ३-४ वर्षांपूर्वी फक्त जमिनीचा तुकडा होता.
पायाभूत सुविधा प्रकल्पाचे महत्त्व व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले, “ही देखील एक वस्तुस्थिती आहे की यूपीसारखे विशाल राज्य पूर्वी एकमेकांपासून मोठ्या प्रमाणात कापले गेले होते. लोक वेगवेगळ्या भागात जायचे पण त्यामुळे चिंता वाटायची. एकमेकांशी संपर्काचा अभाव होता. पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांसाठी, त्यांची घरे जिथे होती तितकाच विकास मर्यादित होता. मात्र, पूर्वांचल एक्स्प्रेस वे आज यूपीमध्ये ही दरी भरून काढत आहे, यूपीला एकमेकांशी जोडत आहे.”
त्यांनी अखिलेश यादव यांची खिल्ली उडवत ते म्हणाले की, “पूर्वीच्या यूपी सरकारला फक्त त्यांच्या कौटुंबिक संपत्तीची काळजी होती.” ते असेही म्हणाले की उत्तर प्रदेशातील मागील सरकारने मला विकासात साथ दिली नाही.
“गरिबांना पक्की घरे मिळावीत, गरिबांना शौचालये असावीत, महिलांना उघड्यावर शौचास जावे लागू नये, प्रत्येकाच्या घरात वीज असावी, अशी अनेक कामे इथे व्हायला हवी होती. पण यूपीमधील तत्कालीन सरकारने मला साथ दिली नाही याचे खूप मला दुःख आहे.” असं ते पुढे म्हणाले.
हे ही वाचा:
राज्याला फडणवीसांसारख्या फुलटाईम मुख्यमंत्र्याची गरज
रझा अकादमी, अर्जुन खोतकर नितेश राणेंच्या निशाण्यावर
पूजा ददलानीला तिसरे समन्स; त्यानंतर काय?
वय इथले संपत नाही; १०४ वर्षांच्या आजीने मिळविले ८९ गुण
त्यांनी जोडले की एक्सप्रेसवे पूर्वांचलला जोडत आहे आणि त्यामुळे संपूर्ण उत्तर प्रदेशला फायदा होईल. दिल्ली ते बिहार प्रवास देखील सुलभ होईल असे त्यांनी सांगितले. “मला आनंद आहे की आज हा प्रदेश विकासाचा नवा अध्याय लिहित आहे.” असं ते या कार्यक्रमात म्हणाले.