मागील वर्षी आंध्र प्रदेशमध्ये एक भीषण रेल्वे अपघात झाला. या अपघातात दोन्ही लोको पायलट मोबाइलवर मॅच पाहत होते. त्यांच्या हलगर्जीपणामुळे १४ जणांना आपला जीव गमवावा लागला. तसेच काहीसे चित्र सध्या बोरीवलीतील रिक्षांमध्ये दिसून येते. बोरीवलीतील काही रिक्षांचे चालक कानात इअरफोन घालून गाडी चालवत असतात. मोबाइलवर बोलून ते स्वतःबरोबर दुसऱ्याचाही जीव धोक्यात घालत आहेत. रिक्षा चालवताना मोबाइवर बोलणे, गाणी ऐकणे, पिक्चर बघणे हे नियमबाह्य असूनही हे चालक बिनधास्त मोबाइलवर बोलून गाडी चालवत असतात.
गाडी चालवताना फोनवर बोलणे हा कायद्याने गुन्हा आहे. गाडी चालवताना फोनवर बोलण्यामुळे अपघात घडतात. तरीही अनेक ठिकाणी वाहन चालक मोबाइलवर फोनवर बोलताना दिसतात आणि अपघातांना आमंत्रण देतात. या अपघाताचे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. हे व्हिडीओ अंगाचा थरकाप उडवणारे असतात.
हेही वाचा :
मला ऐकून लोक कंटाळले आहेत या मोदींच्या विधानावर मैथिली म्हणाली बिल्कुल मग…
‘कर’ आहे त्याला डर; दंडाविरोधात काँग्रेसने केलेले अपील फेटाळले
मद्रास उच्च न्यायालयाने निकालात केला बदल
‘सिक्सर किंग’ रोहित शर्माने केली धोनीची बरोबरी
वाहन चालवताना ड्रायव्हरच्या चुकीची किंमत दुसऱ्याला चुकवावी लागते, हे रोज येणाऱ्या बातम्यांवरून कळू शकते. वाहन चालवताना निष्काळजीपणामुळे अनेकांच्या संपूर्ण कुटुंबाचे मोठे नुकसान झाल्याची अनेक उदाहरणेही आहेत. या रिक्षाचालकांवर योग्य ती कारवाई ट्रॅफिक पोलिसांनी करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.