26 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरविशेषकाय आहे आयुष्यमान भारत कार्ड?

काय आहे आयुष्यमान भारत कार्ड?

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी आयुष्मान भारत डिजिटल मिशन सुरू केले, ज्याअंतर्गत लोकांना हेल्थ आयडी प्रदान करण्यात येतील. यामध्ये लोकांच्या आरोग्य नोंदी असतील. यात डिजिटल आणि आरोग्यसेवेमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची क्षमता असल्याचे मोदींनी सांगितले.

पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले की, मिशन आरोग्य सुविधा मजबूत करण्यासाठी गेल्या सात वर्षांच्या प्रयत्नांमध्ये एक नवीन टप्पा आहे. आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या पायलट प्रोजेक्टची घोषणा पंतप्रधानांनी १५ ऑगस्ट २०२० रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून केली होती. सध्या, आयुष्मान भारत डिजिटल मिशन सहा केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रायोगिक टप्प्यात राबवले जात आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा (एबी पीएम-जेएवाय) तिसरा वर्धापन दिन साजरा केल्यानंतर त्याची देशव्यापी अंमलबजावणी सुरू झाली. आपल्या भाषणामध्ये, पंतप्रधान मोदी म्हणाले की, आयुष्मान भारत डिजिटल मिशनमध्ये आमच्या आरोग्य सुविधांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची क्षमता आहे.

हे ही वाचा:

लोकल रेल्वे बंद; मग शाळेत जायचे तरी कसे?

योगी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार! सात नव्या चेहऱ्यांना संधी

आज जागतिक नदी दिवस; पण मुंबईतील नद्या मरणपंथाला!

‘लिफ्ट करा दे’ च्या नादात अखिलेश यांची पोलखोल

पंतप्रधानांनी नमूद केले की भारतात जवळपास १३० कोटी आधार वापरकर्ते, ११८ कोटी मोबाईल ग्राहक, ४३ कोटी जन धन बँक खाती आहेत आणि अशी जोडलेली पायाभूत सुविधा जगात कुठेही मिळू शकत नाही. आयुष्मान भारत डिजिटल मिशन विश्वासार्ह डेटा प्रदान करेल, ज्यामुळे उत्तम उपचार आणि रुग्णांसाठी बचत सुनिश्चित होईल, असे ते म्हणाले. पंतप्रधान म्हणाले की, मिशन अंतर्गत देशातील लोकांना आता डिजिटल हेल्थ आयडी मिळेल. प्रत्येक नागरिकाच्या आरोग्यविषयक नोंदी डिजिटल संरक्षित केल्या जातील, गरीब आणि मध्यमवर्गीयांना या मिशनचा सर्वाधिक फायदा होईल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा