30 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरविशेष'सरकारकडून कारवाई हवी, निषेध नको!'

‘सरकारकडून कारवाई हवी, निषेध नको!’

राज्यपालांचा ममता सरकारवर संताप

Google News Follow

Related

कोलकाता येथील आरजी मेडिकल कॉलेज-हॉस्पिटलमध्ये एका महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि त्यानंतर झालेल्या हत्येमुळे संपूर्ण देश हादरला आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत देशभरातील वैद्यकीय कर्मचारी आंदोलन करत आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही बोस यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर प्रश्न उपस्थित करत संताप व्यक्त केला. एबीपी न्यूजशी संवाद साधताना ते म्हणाले की, कोलकाता पोलीस आपले काम योग्य प्रकारे करत नाही, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

राज्यपाल सीव्ही बोस म्हणाले की, मुख्यमंत्र्यांकडेच गृहमंत्री खाते आहे, त्यांनी कारवाई करायला हवी होती, मात्र त्यांनी ती केली नाही. ते पुढे म्हणाले की, ‘सरकारकडून कारवाईची गरज आहे, निषेध नाही’. लोकांनी आपल्या आतील शक्तीला ओळखले पाहिजे नाहीतर गुंडाराज चालतच राहणार. डॉक्टर मुलीवर बलात्कार झाला तिची हत्या झाली, परंतु ही आत्महत्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. बंगालमध्ये लोकांचे मूलभूत अधिकार धोक्यात आले आहेत. या प्रकरणात सत्येची हत्या झाली असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

हे ही वाचा :

आम आदमी पार्टीच्या हरभजनसिंग यांनी ममतांना विचारला तिखट सवाल

ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करणाऱ्या विद्यार्थ्यालाही सोडले नाही

ओमर अब्दुल्ला म्हणतात, ‘निवडणुकीनंतर आम्ही कलम ३७० रद्द करण्याचा ठराव मांडू’

कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणः सोशल मीडियावरून पीडितेचे नाव, फोटो, ओळख हटवण्याची मागणी !

 

१४ ऑगस्टच्या रात्री उशिरा काही हल्लेखोरांनी आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये घुसून प्रचंड तोडफोड केली होती. याबाबत राज्यपाल सी.व्ही. बोस म्हणाले, पोलिसांच्या संगनमत शिवाय गुंडांचा जमाव रुग्णालयात येऊ शकला नसता. हे एका भयंकर युद्धासारखे होते. राजकीय पाठिंब्याशिवाय हे सर्व शक्य नाही. पोलिसांनी आपले काम का नाही केले?, हे सर्व सीबीआयच्या तपासात बाहेर येईल, असे राज्यपाल सीव्ही बोस म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा