तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा आणि तामिळनाडू सरकारच्या मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांची अनेक वक्तव्ये वादाची कारणे ठरत आहेत.यापूर्वी देखील स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत बेताल वक्तव्य केले होते.आता त्यांनी राम मंदिराच्या उभारणीवर प्रश्न उपस्थित केला आहे.मशीद पाडून मंदिर बांधणे आम्हाला मान्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तामिळनाडू सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन चेन्नईमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते.ते म्हणाले की, द्रमुकचा कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही.मंदिर बांधण्यात आमची काही अडचण नाही, पण मशीद पाडून तिथे मंदिर बांधणे आम्हाला अजिबात मान्य नाही. अध्यात्म आणि राजकारण यांची सांगड घालणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.उदयनिधी यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा वाद वाढण्याची शकता आहे.
हे ही वाचा:
थलसेना दिवसाच्या अमृतमहोत्सवानिमित्त रक्तदान, शस्त्रप्रदर्शनाला गणेश नाईक, समीर वानखेडेंची उपस्थिती
जम्मू-काश्मीर: राजौरीमध्ये भूसुरुंग स्फोटात एक जवान हुतात्मा, दोन जवान जखमी!
मुंबई महापालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याचे पैसे संजय राऊतांच्या बंधू, लेकीच्या खात्यात
अदानीविरोध करणारी काँग्रेस तेलंगणातील करारानंतर गप्प
दरम्यान, याआधीही त्यांनी हिंदू धर्माबाबत अनेकदा वादग्रस्त विधाने केली आहेत. अलीकडेच त्यांच्या एका विधानावरुन बराच वाद झाला होता. त्यात त्यांनी सनातनला केवळ विरोध करून चालणार नाही, तर तो नष्ट केला पाहिजे, असे म्हटले होते. डेंग्यू, मलेरिया, डास किंवा कोरोनाला आपण विरोध करू शकत नाही, त्यांचा थेट नायनाट करायचा आहे. तसेच सनातनलाही नष्ट करायचे आहे, असे बेताल वक्तव्य उदयनिधी यांनी केले होते.