जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात तीव्र संताप निर्माण झाला आहे. सामान्य नागरिकांपासून ते चित्रपटसृष्टीतील कलाकारांपर्यंत सर्वजण या घटनेचा तीव्र निषेध करत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेत्री रासी खन्नानेही आपला रोष व्यक्त केला असून नागरिकांनी एकत्र येऊन या संकटाचा सामना करण्याचे आवाहन केले आहे. माध्यमांशी बोलताना रासी खन्ना म्हणाली, “मी हिंसेचा निषेध करते. मी काही व्हिडीओ पाहिले आहेत आणि जो कोणी ते पाहील, त्याचे हृदय निश्चितच तुटेल. या हल्ल्याचा आपल्या देशावर मोठा परिणाम झाला आहे. मला आशा आहे की आपण एक राष्ट्र म्हणून या परिस्थितीला तोंड देऊ आणि यापेक्षा अधिक बळकट होऊन पुढे जाऊ.”
रासी खन्ना ही दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत ओळखले जाणारे नाव आहे. तिने २०१३ मध्ये जॉन अब्राहमच्या ‘मद्रास कॅफे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिने रूबीची भूमिका साकारली होती, जिला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. २०१४ मध्ये ‘उहालु गुसागुसालदे’ या चित्रपटातून तिने तेलुगू सिनेमात प्रवेश केला आणि २०१८ मध्ये ‘ईमायका नोडिगल’ या चित्रपटातून तमिळ सिनेमात पदार्पण केले.
हेही वाचा..
मुंबईच्या लोखंडवालामध्ये इमारतीत आग
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले तरुणांबद्दल ?
दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघातात ६ ठार
‘…त्या घोडेवाल्याने ३५ बदुकांचा उल्लेख केला होता!’ पोलिसांनी घेतले ताब्यात
अभिनयासोबतच रासी एक उत्तम गायिका देखील आहे. ती तेलुगू भाषेत प्लेबॅक सिंगिंग करते. तिच्या वैयक्तिक आयुष्यातील बाबतीत बोलायचं झालं, तर तिचा जन्म ३० नोव्हेंबर १९९० रोजी नवी दिल्लीत झाला. ती १२वीमध्ये शाळेची टॉपर होती. पुढील शिक्षण तिने दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेज फॉर विमेन येथून इंग्रजी विषयात पदवी घेतली. तिचे वडील राजकुमार खन्ना दिल्ली मेट्रोत कार्यरत आहेत आणि तिची आई सरिता खन्ना गृहिणी आहेत. अलीकडेच रासी ‘द साबरमती रिपोर्ट’ आणि ‘अरनमाई ४’ या चित्रपटांमध्ये झळकली होती. लवकरच ती तेलुगू चित्रपट ‘तेलुसु कडा’ मध्ये दिसणार आहे.