गाझा पट्टीतील रूग्णालयावरील हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

स्फोटात ५०० जणांचा मृत्यू

गाझा पट्टीतील रूग्णालयावरील हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

शनिवार, ७ ऑक्टोबर रोजी हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर या भागात युद्धाला सुरुवात झाली आहे. गेल्या ११ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत चार हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. दरम्यान, गाझातील अल-अहली रुग्णालयात भीषण मोठा स्फोट झाला. या स्फोटात तब्बल ५०० जणांचा मृत्यू झाला. या वृत्ताने संपूर्ण जगाला हादरा बसला आहे. हा स्फोट कोणी घडवून आणाला यावरून हमास आणि इस्रायल यांच्यात आरोपप्रत्यारोप सुरू आहेत.

 

दरम्यान, या घटनेवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये मोदी यांनी म्हटलं आहे की, “गाझामधील अल अहली रुग्णालयात झालेल्या जीवितहानीबाबतचं वृत्त ऐकून मला धक्का बसला आहे. ही खूप दुःखद घटना आहे. पीडितांच्या कुटुंबीयांप्रती आमच्या संवेदना, तसेच या स्फोटात जखमी झालेले लोक लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो. तिथे सध्या सुरू असलेल्या संघर्षात नागरिकांचे बळी जाणे ही गंभीर आणि चिंतेची बाब आहे. यात सहभागी असणाऱ्यांना जबाबदार धरले पाहिजे.”

हमासने हल्ला केल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीतील नागरिकांना स्थलांतर करण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर, इस्रायलने गाझा पट्टीतल्या सुविधा खंडित केल्या आहेत. गाझा पट्टीत गेल्या काही दिवसांपासून वीज, पाणी या सुविधा उपलब्ध नाहीत. अशातच अनेक रुग्णालयातील इंधनसाठा संपत आल्याने रुग्णांचा जीवही धोक्यात आला आहे. दरम्यान, गाझातील अल अहली रुग्णालयात भीषण स्फोट घडवून आणण्यात आला. या स्फोटात जवळपास ५०० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटामुळे रुग्णालय इमातीला भीषण आग लागली. या आगीत होरपळून अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रुग्णालय परिसरातील मैदानात मृतदेहांचा खच पडला आहे.

हे ही वाचा:

पुनर्विकासाच्या वादातून गृहनिर्माण सोसायटीच्या सेक्रेटरीवर जीवघेणा हल्ला

ऑलिम्पिकमधील क्रिकेटच्या कार्यक्रमावर २०२५पर्यंत शिक्कामोर्तब!

द. आफ्रिकेचा केशव महाराज ‘ओम’ लिहिलेल्या बॅटने होता खेळत; फोटो व्हायरल

पाकिस्तानचा रडीचा डाव; अहमदाबादच्या प्रेक्षकांवर आरोप

अल अहली रुग्णालयावर हल्ला कोणी केला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हमासने इस्रायलवर आरोप केला आहे. तर इस्रायली सरकारने हे आरोप फेटाळून लावले आहेत. या हल्ल्यामागे हमासच असल्याचं इस्रायली लष्कराने म्हटलं आहे.

Exit mobile version