हॉकीतील पराभवावर काय म्हणाले मोदी?

हॉकीतील पराभवावर काय म्हणाले मोदी?

टोक्यो ओलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाचा सेमीफायनलमध्ये बेल्जियमकडून पराभव झाल्यानंतर सुवर्णपदकाचं स्वप्नही तुटलं. भारत अजूनही कांस्य पदक पटकावू शकतो. मात्र १९८० नंतर पहिल्यांदाच सुवर्णपदक पटकावण्याची हॉकी संघाला असलेली संधी यंदातरी हातातून निसटली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाची निराशा दूर करत त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक ट्विट केलं.

पंतप्रधान मोदींनी ट्वीट केलं की, “पराभव आणि विजय हे जीवनाचा हिस्सा आहे. टोकियो २०२० मध्ये आपल्या पुरुष हॉकी संघानं आपली सर्वश्रेष्ठ खेळी केली आणि हेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. संघाला पुढचा सामना आणि त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा. भारताला आपल्या खेळाडूंवर गर्व आहे.”

टोक्यो ओलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाला सेमीफायनलमध्ये बेल्जियमकडून ५-२ च्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला आणि त्यासोबतच बेल्जियम फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ पोहोचला. तर भारताची सुवर्णपदकासह रौप्यपदकाची यंदाच्या ऑलिम्पिकमधील आशा संपली आहे. तिसऱ्या स्थानासाठीचा सामना खेळून भारतीय संघ कांस्य पदक मिळवण्याचा प्रयत्न करणार असला तरी सुवर्णपदकाची प्रतिक्षा मात्र आणखी एका ऑलिम्पकसाठी वाढली आहे.

हे ही वाचा:

सगळं खुल केलं मग मंदिर का बंद?

सर्वांच्या पाठीवर ‘शिव पंख’ लावा

‘या’ देशात झाला मोठा दहशतवादी हल्ला

बसच्या रांगेतच उभे राहा! मुंबईकरांच्या लोकल रेल्वे मागणीवर फुलीच

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाला सेमीफायनल्समध्ये पराभवाचा सामना करावा लागला. सामन्यात भारतानं दोन गोल डागले, तर बेल्जियमनं पाच गोल डागत भारतावर मात केली. या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाचं फायनल्स गाठण्याचं स्वप्न भंगलं असून बेल्जियमनं फायनल्समध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. भारतीय पुरुष हॉकी संघ सुवर्णपदक आणि रौप्य पदकाच्या शर्यतीतून बाहेर गेला असला तरी अद्यापही कांस्यपदक जिंकण्याची संधी आहे. दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यात विजयी संघ फायनल्समध्ये खेळणार, तर पराभूत झालेला संघाचा सामना कांस्य पदकासाठी भारतासोबत होणार आहे.

Exit mobile version