घराचे नाव ‘रामायण’ अन घरच्या लक्ष्मीला कोणीतरी पळवून नेईल!

अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांच्या कुटुंबाशी जोडला जातोय संबंध

घराचे नाव ‘रामायण’ अन घरच्या लक्ष्मीला कोणीतरी पळवून नेईल!

उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एका कविसंमेलनादरम्यान कवी कुमार विश्वास यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ‘तुमच्या मुलांना रामायण वाचण्याची सवय लावा. नाहीतर घराचे नाव रामायण अन घरच्या लक्ष्मीला कोणीतरी पळवून नेईल,’ असे कुमार विश्वास यांनी म्हटले आहे. कुमार विश्वास यांनी केलेल्या वक्तव्याचा संबंध अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी जोडला जात आहे. कुमार विश्वास यांनी शत्रुघ्न सिन्हा यांचे नाव न घेत ही टिप्पणी केली आहे.

कवी कुमार विश्वास यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये कुमार विश्वास म्हणतात, “तुमच्या मुलांना सीताजींच्या बहिणींबद्दल सांगा. प्रभू रामाच्या भावांची नावे आठवा. मी एक संकेत देत आहे, ज्यांना समजते त्यांनी टाळ्या वाजवाव्यात. विश्वास पुढे म्हणाले, आपल्या मुलांना रामायण ऐकवा, गीता वाचण्याची सवय लावा. नाहीतर असे होऊ नये, “तुमच्या घराचे नाव ‘रामायण’ आहे आणि तुमच्या घरातील श्री लक्ष्मीला अन्य कोणीतरी घेवून जाईल.

हे ही वाचा : 

आगरतळा रेल्वे स्थानकावर ३ बांगलादेशी घुसखोरांना अटक!

पंतप्रधान मोदींकडून ७१ हजारांहून अधिक तरुणांना नियुक्तीपत्रांचे वाटप

फडणवीस-भुजबळांची भेट, १०-१२ दिवसात तोडगा काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर लिखित ‘गानसरस्वती आदिशक्तीचा धन्योद्गार!’चे शनिवारी प्रकाशन

कुमार यांच्या वक्तव्याची सोशल मिडीयावर बरीच चर्चा होत आहे. यावर अनेकांनी सहमती दर्शविली आहे तर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी कुमार यांच्या वक्तव्याचा संबंध अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांच्या कुटुंबाशी जोडला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांच्या घराचे नाव ‘रामायण आहे’. तसेच त्यांची मुलगी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचा नुकताच काही महिन्यांपूर्वी लग्न सोहळा पार पडला. सोनाक्षी सिन्हाने झहीर इक्बालसोबत लग्न केले आहे. दरम्यान, कुमार विश्वास यांच्या वक्तव्यावर काँग्रेसकडून टीका करण्यात येत आहे.

Exit mobile version