27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषकाय आहेत आयपीएलसाठीचे नवे नियम?

काय आहेत आयपीएलसाठीचे नवे नियम?

Google News Follow

Related

आयपीएल २०२१ कोरोनाचा शिरकाव झाल्याने मध्येच थांबवण्यात आली. आता उर्वरीत स्पर्धा युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसंबधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक नियमावली जाहीर केली आहे.

स्पर्धेदरम्यान बीसीसीआयने खेळाडूंची सुरक्षा आणि कोरोना नियमांना समोर ठेवून ही नियमावली तयार केली आहे. यातील एक महत्त्वाचा नियम म्हणजे फलंदाजाने चेंडू षटकार, चौकार मारुन स्टँडमध्ये किंवा मैदानाबाहेर पाठवला. तर तो चेंडू बदलला जाईल. तसेच बाहेर गेलेल्या चेंडूला संपूर्णपणे सॅनिटाईज करुन ठेवले जाईल.

इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसने बीसीसीआयच्या नियमावलीनंतर दिलेल्या माहितीनुसार ,“जर चेंडू स्टँडमध्ये किंवा  स्टेडियम बाहेर जातो. तर चौथा पंच त्याच्याकडी चेंडूंशी तो चेंडू बदलून नवा चेंडू खेळण्यासाठी देईल. तसेच बाहेरुन आलेला चेंडू सॅनिटायज करुन त्याच्याकडील चेंडूमध्ये ठेवला जाईल.”

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, चेंडूंवर रिसर्च केल्यानंतर त्यातून कोरोना व्हायरसचे संक्रमण होण्याची शक्यता खूप कमी आहे. तरी देखील कोणतीही जोखीम बीसीसीआय घेणार नसल्याने हा सॅनिटायजेशनचा पर्याय बीसीसीआय वापरत आहे. मागील वर्षी काही खेळाडू कोरोनाबाधित झाल्याने स्पर्धा मध्येच थांबवली होती. त्यामुळे यंदा अशी कोणतीच जोखीम बीसीसीआयला घ्यायची नाही. स्पर्धेसाठी प्रेक्षकांना बोलवण्याबाबत बीसीसीआय विचार करत असून प्रेक्षक आले तरी त्यांना कडक नियम पाळावे लागणार आहेत.

हे ही वाचा:

भारतात उपलब्ध होणार आणखी एक लस!!

ऑगस्ट क्रांतिदिनी काँग्रेस नेत्याच्या फेसबुकवर ‘कांती’च्या मशाली

शिवसेना राष्ट्रवादीच्या खुंटीला बांधल्याचे चित्र

चारशे कोटींचे खाशाबांचे स्टेडियम महाराष्ट्रात का नाही?

आयपीएलसाठी युएईत येणाऱ्या खेळांडूसह सपोर्ट स्टाफ अशा सर्वांना सहा दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. तसेच बायो बबलमध्ये येण्यापूर्वी त्यांच्या तीन कोरोना चाचण्या होणे आणि त्या तीनही निगेटिव्ह येणे अनिवार्य आहे. इंग्लंडमधील भारतीय खेळाडूंना विलगीकरणाचे नियम पाळावे लागणार नसले तरी त्यांना बायो बबलचे नियम मात्र पाळावे लागणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा