व्हेल माशाच्या उल्टीला जगभरात मोठी किंमत आहे. अत्तर किंवा सुगंधित उत्पादनासाठी व्हेल माशाच्या उल्टीचा वापर केला जातो. तसेच काही औषधांमध्येही याचा वापर केला जातो. त्यामुळे बाजारात व्हेल माशाच्या उल्टीला बाजारात कोट्यावधी रुपयांची किंमत आहे. त्यामुळे अनेक लोक याचा शोध घेवून त्याची विक्री करण्यास धडपडत असतात. दरम्यान, व्हेल माशाच्या उल्टीची विक्री करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कल्याण क्राईम ब्रांचचे सापळा रचत तिघांना अटक केली आहे, त्यांच्याकडून तब्बल ६ कोटी २० लाख रुपये किमतीची व्हेल माशाची उल्टी जप्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हेल माशाच्या उल्टीची विक्री करण्यासाठी काही इसम एका कारमधून बदलापूर पाईपलाईन रोडवर येणार असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रांचला मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचला. यावेळी पथकाला संशयित वाहन दिसल्याने त्याची तपासणी केली असता, व्हेल माशाची उल्टी सापडली. या प्रकरणी गाडीतून तिघांना ताब्यात घेतले, अनिल भोसले ,अंकुश माळी ,लक्ष्मण पाटील अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
हे ही वाचा :
नेपाळमध्ये पावसाचा कहर, ११२ लोकांचा मृत्यू, ६८ बेपत्ता आणि २२६ घरे उद्ध्वस्त!
जम्मू-काश्मीरमधील मौलवी म्हणाले, योगी साहेब ‘राम-राम’
अलौकीक प्रतिभेसमोर नतमस्तक व्हा…
नाव जाहीर करायला लाज का वाटते ?
पथकाने आरोपींकडून तब्बल ६ कोटी २० लाख रुपयांची व्हेल माशाची उल्टी जप्त केली. दरम्यान, पोलिसांनी तिघांनी ताब्यात घेतले आहे. व्हेल माशाची उल्टी कोठून आणली, कोठे-कोणाला विकणार होती, याचा तपास सध्या कल्याण क्राईम ब्रांच करत आहे.