राज्यातल्या अतिवृष्टी झालेल्या भागात तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्याच प्रमाणे शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यानी दिले आहेत.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी विरेधी पक्षनेते अजित पवार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.
महाराष्ट्राच्या बहुतांश भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातच परतीच्या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देऊन त्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले आहेत .
हे ही वाचा:
एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीची गोड बातमी
दीड महिन्यात १ कोटीहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी घेतला ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेचा लाभ
पीएफआयला राम मंदिर पाडून बाबरी मस्जिद बांधायची होती
पूजा चव्हाणसाठी मी लढत असताना भास्करशेठ तुम्ही कुठल्या बिळात लपला होतात?
लांबलेल्या परतीच्या पावसानं शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झालं आहे. सोयाबीन, कापूस पिकांना मोठा फटका बसला आहे. रब्बी पिकेही धोक्यात आली आहेत. राज्यातल्या विविध भागात पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी असे अजित पवार यांनी सांगितले.
दरम्यान दहिसर येथे आमदार पक्ष सुर्वे यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन केल्यानंतर बोलताना कृषी मंत्री अब्दुल सत्तर यांनीही राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यात राज्य सरकार कुठंही कमी पडणार नाही असे आश्वासने दिले आहे.