रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलिसांच्या ताफ्यात ‘बॉडी’गार्ड

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलिसांच्या ताफ्यात ‘बॉडी’गार्ड

रेल्वेतील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या सुरक्षा दलाच्या ताफ्यात बॉडी कॅमेरे उपलब्ध होणार आहेत. पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाकडे ४० बॉडी कॅमेरे उपलब्ध होणार आहेत. हे कॅमेरे पुढील महिन्यात रेल्वे सुरक्षा दलाला मिळतील, अशी माहिती सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त विनीत खारप यांनी दिली आहे.

लोकल किंवा मेल- एक्स्प्रेस गाड्यांमधून प्रवास करताना प्रवाशांना अनेकदा गुन्हेगारीच्या घटनांना सामोरे जावे लागते. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी विविध स्थानकांमध्ये तैनात असतात. हे कर्मचारी गाड्यांमध्येही गस्त घालत असतात. गुन्ह्यांचा तपास करताना स्थानकातील सीसीतीव्हींची मदत घेतली जाते. मात्र, लोकल गाड्या आणि मेल एक्स्प्रेस गाड्यांमध्ये सीसीटीव्ही उपलब्ध नाहीत. रेल्वेच्या काही महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही असून सर्व डब्यांमध्ये हे कॅमेरे उपलब्ध नाहीत. त्यामुळे पोलिसांना गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी स्थानकावरील कॅमेऱ्यावरच अवलंबून राहावे लागते.

हे ही वाचा:

कोण होणार नवे हवाई दल प्रमुख?

परमबीर सिंग यांची लाचलुचपत विभागाकडून ‘ओपन एन्क्वायरी’

‘त्या’ निलंबित आमदारांना करता येणार राज्यसभा पोटनिवडणुकीत मतदान

भूकंपाने हादरला कांगारूंचा देश

रेल्वे गाड्यांमध्ये गस्त घालताना आणि बऱ्याचदा प्रवाशांमधील वादविवाद आणि भांडण तंटे रोखताना पोलिसांचा गोंधळ उडत असतो. बऱ्याचदा अशा वादाच्या प्रसंगात प्रवासी किंवा गुन्हेगारही पोलिसांशी वाद घालतात किंवा त्यांना धक्काबुक्की करतात. अशा घटना रोखण्यासाठी ४० बॉडी कॅमेरे घेण्याचा निर्णय घेतल्याचे पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त विनीत खाराप यांनी सांगितले. सध्या दहा कॅमेरे असून आणखी कॅमेऱ्यांची भर पडल्यावर प्रथम मेल- एक्स्प्रेस गाड्यांमधील सुरक्षेसाठी ते तैनात केले जाणार आहेत. यातील चित्रण पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version