26 C
Mumbai
Monday, December 30, 2024
घरविशेषपश्चिम रेल्वेच्या सेवेत 'यात्री ॲप'

पश्चिम रेल्वेच्या सेवेत ‘यात्री ॲप’

आता 'यात्री' या ॲपद्वारे ट्रेनचे नियोजन आणि ट्रॅकिंग अधिक सोपे होणार

Google News Follow

Related

लोकल ट्रेनला मुंबईची ‘लाइफलाइन’ म्हटले जाते. लोकल ट्रेनमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. आता ‘यात्री’ या ॲपद्वारे तुमच्या ट्रेनचे नियोजन आणि ट्रॅकिंग अधिक सोपे होणार आहे.

यात्री ॲप जुलैमध्ये बनवण्यात आले होते आणि ते फक्त मध्य रेल्वेमध्ये वापरले जात होते. मध्य रेल्वेमध्ये या ॲपचे सहा लाखांहून अधिक वापरकर्ते आहेत. या ॲपमुळे प्रवाशांना ट्रेनला ट्रॅक करण्यात आणि ट्रेनचे आगमन तपासण्यात मोठी मदत झाली. आता ही उपयुक्त सेवा पश्चिम रेल्वेसाठी लवकरच उपलब्ध होणार आहे ! पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक निरज वर्मा यांच्या मते, हे ॲप पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी या महिन्याच्या अखेरीस सेवेत येईल. यात्री ॲप अँड्रॉइड तसेच आयओएस वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल.

हे ही वाचा : 

अजबचं! कोण आधी फोटो काढणार? प्रश्नावरून लग्न मंडपात हाणामारी

पदयात्रेला ब्रेक देऊन राहुल गांधी परदेश यात्रेला जाणार?

नरेंद्र मोदींच्या हत्येसाठी तयार राहा, म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्याला अटक

पेरूमधील आंदोलकांनी विमानतळ घेतले ताब्यात ; पोलिस अधिकाऱ्यांना ठेवले ‘ओलीस’

आता प्रश्न असा आहे की हे ॲप कसे वापरायचे? ते खूप सोपे आहे. प्रथम मूळ स्थानक निवडा, नंतर मार्ग निवडा (कल्याण किंवा सीएसएमटी च्या दिशेने) आणि अंतिम टप्प्यात, त्यावेळेस नियोजित केलेली ट्रेन निवडा आणि तिचे थेट अपडेट पहा! उपनगरीय रेकवर जीपीएस स्थापित केल्यामुळे, थेट ट्रेन ट्रॅकिंग अधिक सोपे होते. या ॲपमध्ये अपडेटेड वेळापत्रक, भाडे तपशील, प्रवास नियोजक इत्यादी देखील असतील. हे ॲप हार्बर लाईन्ससाठी देखील उपलब्ध असेल. वापरकर्ते ओरिजिन, टर्मिनेशन, स्लो, फास्ट, एसी इ.च्या आधारे ट्रेन फिल्टर सुद्धा करू शकतात. म्हणजेच आता लोकल ट्रेन चा प्रवास अजून सोपा आणि नियोजित पाने केला जाणार आहे!

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा