24 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरविशेषविंडीजचा १४० किलोचा कॉर्नवॉल भारताला पडेल भारी?

विंडीजचा १४० किलोचा कॉर्नवॉल भारताला पडेल भारी?

वेस्ट इंडिज विरुद्ध भारत कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या संघात कॉर्नवॉल आणि गुडाकेश यांचे पुनरागमन

Google News Follow

Related

वेस्ट इंडिज विरुद्ध भारताचा पहिला कसोटी सामना १२ ते १६ जुलै, डॉमिनिका येथे पार पडणार आहे.या सामन्यासाठी वेस्ट इंडिजने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. या संघात दोन राखीव खेळाडूंना संधी मिळाली आहे. तसेच, १४० किलो वजनाचा अँटिग्वाचा ‘रहकीम कॉर्नवॉल’ संघात परतला असून क्रेग ब्रॅथवेट हा वेस्ट इंडिजचा कर्णधार असेल.वेस्ट इंडिजने पहिल्या कसोटीसाठी १३ जणांचा संघ जाहीर केला आहे.डॉमिनिका येथे होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी वेस्ट इंडिज आणि भारत हे संघ आपल्या दमदार खेळाडूंसह मैदानात उतरत आहेत.वेस्ट इंडिजने जाहीर केलेल्या संघात अनेकांना स्थान दिले आहे जे भारतीय संघाला भारी पडू शकतात.

वेस्ट इंडिजने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी त्यांचा कसोटी संघ जाहीर केला त्यात राखीव खेळाडू म्हणून गुडाकेश, कॉर्नवॉल यांना संघात स्थान दिले आहे.’सर्वात वजनदार खेळाडू’ म्हणून ओळखला जाणारा फिरकीपटू रहकीम कॉर्नवॉलचे पुनरागमन झाले आहे.या संघात दोन राखीव फलंदाजांचाही समावेश करण्यात आला आहे.तसेच क्रेग ब्रॅथवेट हा होणाऱ्या कसोटीत विंडीज संघाची कमान सांभाळणार आहे.रोहित शर्मा अँड कंपनी विरुद्ध मायदेशात होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिजने अनेक आश्चर्यकारक नावे जाहीर केली आहेत. डॉमिनिका येथील कसोटीसह भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांची आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप मोहीम सुरू होईल.

डावखुरा फलंदाज कर्क मॅकेन्झीने बांगलादेश अ विरुद्धच्या अलीकडील मालिकेदरम्यान वेस्ट इंडिज अ संघासाठी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर संघात स्थान मिळाले आहे. त्याचवेळी त्याचा साथीदार अॅलिक अथानाझचाही संघात समावेश करण्यात आला आहे.हे दोघेही कसोटी पदार्पणाच्या रांगेत आहेत. हे दोघेही वेस्ट इंडिजसाठी दीर्घ शर्यतीचे घोडे ठरू शकतात, असा विश्वास वेस्ट इंडिजचे मुख्य निवडकर्ता डेसमंड हेन्स यांनी व्यक्त केला.हेन्सने सांगितले की, या दोघांनी अलीकडेच वेस्ट इंडिज अ संघात सामील होऊन बांगलादेश दौऱ्यावर ज्या प्रकारची कामगिरी केली आहे,त्यामुळे ते खूप प्रभावित झाले आहेत.  टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिली कसोटी १२ जुलैपासून डॉमिनिका येथील विंडसर पार्कवर सुरू होणार आहे.

हे ही वाचा:

पंचायत निवडणूक: तृणमूल काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांची हत्या

शरद पवार म्हणाले की, भाजपाशी चर्चा केली होती; पण विचारधारेमुळे पुढे पाऊल टाकले नाही

आशियाई गेम्ससाठी कुस्तीगीरांची निवड चाचणी अजूनही रखडलेली

नीलम गोऱ्हे अंधारेंवर नाराज की उद्धव ठाकरेंवर

यानंतर मालिकेतील दुसरा कसोटी सामना २० जुलैपासून त्रिनिदाद येथील क्वीन्स पार्क ओव्हल येथे होणार आहे.रोहितसमोर क्रेग ब्रॅथवेट वेस्ट इंडिजचे कर्णधार असेल.वेस्ट इंडिजने युवा वेगवान गोलंदाज जेडेन सील्स आणि अनुभवी अष्टपैलू काइल मेयर्सला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दोघेही नुकतेच दुखापतीतून सावरले आहेत. त्याचबरोबर सलामीवीर क्रेग ब्रॅथवेटकडे पुन्हा एकदा संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.जर रहकीम कॉर्नवॉलला भारताविरुद्धच्या या कसोटी सामन्यात हजेरी लावण्याची संधी मिळाली, तर जवळपास २ वर्षानंतरचा हा त्याचा पहिला कसोटी सामना असेल.

याआधी तो नोव्हेंबर २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध गॉल कसोटीत खेळला होता.रहकीमच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने ९ कसोटी सामन्यात ३४ बळी घेतले आहेत. त्याच वेळी, त्याने २३८ धावा देखील केल्या आहेत, ज्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या ७३ आहे. रहकीम कॉर्नवॉलचे वजन एकेकाळी १४० किलो इतके होते. तो जगातील सर्वात वजनदार क्रिकेटपटूंपैकी एक आहे. स्पिनर म्हणून पहिली पसंती असलेल्या गुडाकेश मोतीला दुखापत झाल्याने कॉर्नवॉलची संघात निवड करण्यात आली आहे. याशिवाय स्लोलेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स गोलंदाज जोमेल वॅरिकनचाही १३ खेळाडूंच्या संघात समावेश आहे. जोमेलने १३ कसोटीत ४१ विकेट घेतल्या आहेत.

पहिल्या कसोटीसाठी वेस्ट इंडिजचा संघ: क्रेग ब्रॅथवेट (क), जर्मेन ब्लॅकवुड (व्हीसी), अलिक अथानाज, टेगेनर चंदरपॉल, रहकीम कॉर्नवॉल, जोशुआ दा सिल्वा, शॅनन गॅब्रिएल, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, कर्क मॅकेन्झी, रॅमन रेफर, केमर रोच जोमेल वॅरिकन रिझर्व्ह: टेविन इम्लाच, अकीम जॉर्डन
विंडीज दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा