पश्चिम बंगाल: वीज कोसळून २७ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी जाहीर केली मदत

पश्चिम बंगाल: वीज कोसळून २७ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी जाहीर केली मदत

पश्चिम बंगालमध्ये सोमवारी वीज कोसळण्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेत २७ जण मृत्युमुखी पडले असल्याची माहिती मिळत आहे. यात हुगळी मध्ये ११ जण, मुर्शिदाबादमध्ये ९ जण, तर पूर्व आणि पश्चिम मिदनापूर मध्ये प्रत्येकी दोन जण मृत झाले आहेत. तर त्यासोबतच बंकुरा आणि नाडीया इथेही प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

सोमवार, ७ जून रोजी पुन्हा एकदा पश्चिम बंगाल राज्यावर अस्मानी संकट कोसळले आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालला ‘यास’ या चक्रीवादळाचा फटका बसला असून या वादळाने राज्याचे बरेच नुकसान केले. त्यातच आता सोमवारी वीज कोसळून राज्यातील २७ नागरिकांचा जीव गेल्याची माहिती आत्तापर्यंत समोर आली आहे. बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे संपूर्ण जून महिन्यात पश्चिम बंगालमध्ये वीज कोसळण्याच्या घटना घडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. तसा धोक्याचा इशाराही राज्याला देण्यात आला आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधानांची भेट घेण्यापूर्वी स्वतःच्या हातातील गोष्टी करायला हव्या होत्या

पुणे आग: मोदींनी जाहीर केली मदत, मुख्यमंत्री ठाकरे निद्रिस्त

सौ सोनार की, एक लोहार की

राज्यांच्या अपयशावर उतारा; सर्वांना मोफत लसीची मोदींची घोषणा

दरम्यान पश्चिम बंगालमधील या दुर्घटनेची दाखल केंद्रीय पातळीवर घेतली गेली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत शोक व्यक्त केला गेला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

तर या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या जनतेच्या नातेवाईकांना आणि जखमी झालेल्यांना पंतप्रधानांनी मदत जाहीर केली आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची, तर जखमींना ५० हजारांची मदत देण्यात येणार आहे.

 

Exit mobile version