पश्चिम बंगाल: अनेक जिल्हे हिंदूमुक्त करण्याचे षड्यंत्र!

भाजपा नेते दिलीप घोष यांचा आरोप

पश्चिम बंगाल: अनेक जिल्हे हिंदूमुक्त करण्याचे षड्यंत्र!

राज्यातील अनेक भागात रामनवमीवरून सुरू असलेल्या गोंधळादरम्यान पश्चिम बंगाल भाजपचे माजी अध्यक्ष दिलीप घोष यांनी शुक्रवारी (११ एप्रिल) एक मोठे विधान केले. ते म्हणाले की, पश्चिम बंगालमधील अनेक जिल्हे हिंदूमुक्त करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे आणि बांगलादेशातून लोक राज्यात येऊन दंगल घडवत आहेत.

‘मालदा, मुर्शिदाबाद, दिनाजपूर, नादिया, बीरभूम, हावडा या जिल्ह्यांना हिंदूमुक्त करण्याचा डाव आहे. बांगलादेशातून लोक इथे येऊन गोंधळ घालत आहेत. म्हणूनच येथे हिंदू समुदायावर वारंवार हल्ले होत असल्याचे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, रामनवमीपूर्वी मुर्शिदाबादच्या मालदा येथील मोथाबारीमध्ये लोकांना धमक्या दिल्या जात आहेत. आमचा मोर्चा याचा निषेध करण्यासाठी आणि सरकारला सावध करण्यासाठी होता. हिंदू समुदायाचे मनोबल वाढवण्यासाठी आम्ही येथे एक रॅली आयोजित केली होती. आम्हाला डीएम ऑफिसला जायचे होते, पण ते आधीच निघून गेले होते. आम्ही आमचा मुद्दा मांडला आहे आणि जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर निषेध सुरूच राहील.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी आज पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील हिंसाचारग्रस्त मोथाबारी भागाला भेट दिली आणि अलीकडच्या संघर्षात बाधित झालेल्या कुटुंबांशी संवाद साधला. त्यांनी पीडित कुटुंबांना कायद्यावर विश्वास ठेवण्यास सांगितले आणि लोकांना एकत्र राहण्याचे आवाहनही केले.

हे ही वाचा : 

चिदंबरम यांनीच नष्ट केला होता, २६/११ प्रकरणातील एक महत्वाचा दुवा

काँग्रेस नेता म्हणतो, वक्फ विधेयकाच्या विरोधात गावागावात ८-१० लोक मरावेत!

“ती म्हणाली – ‘उफ्फ!’ आणि जगाने पाहिलं, प्रेमाला रंग असतो!”

चीनचा पलटवार; अमेरिकन वस्तूंवरील करात १२५ टक्क्यांपर्यंतची वाढ

दरम्यान, मोथाबारी येथे एका धार्मिक स्थळाजवळून मिरवणूक जात असताना नुकतीच हिंसाचाराची घटना घडली होती.  यामध्ये जाळपोळ, तोडफोड आणि लोकांवर हल्ले झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी परिसरात मोठ्या संख्येने पोलिस दल आणि आरएएफ तैनात करण्यात आले होते. यासोबतच परिसरातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांकडून ६० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

चिदंबरम यांनीच नष्ट केला होता २६/११ प्रकरणातील एक महत्वाचा दुवा | Dinesh Kanji | P. Chidambaram |

Exit mobile version