व्यंगचित्रकार नारायण देबनाथ यांचे निधन

व्यंगचित्रकार नारायण देबनाथ यांचे निधन

भारतातील प्रसिद्ध व्यंगचित्रकार नारायण देबनाथ यांचे निधन झाले आहे. ते ९७ वर्षांचे होते. मंगळवार १८ जानेवारी रोजी सकाळी त्यांचे निधन झाले.

देबनाथ हे पश्चिम बंगालचे रहिवासी असून गेले काही महिने कलकत्ता येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. डिसेंबर महिन्याचा २४ तारखेला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेव्हापासून ते व्हेंटिलेटरवर अर्थात लाइफ सपोर्ट सिस्टिमवर होते. आज सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाल्याचे जाहीर करण्यात आले.

नारायण देबनाथ हे भारतातल्या काही प्रसिद्ध व्यंगचित्रकारांपैकी एक होते. त्यांनी रेखाटलेली ‘बंतुल द ग्रेट’ ‘हांडा भोंडा’ ‘नोंते फोंते’ ही कॉमिक बुक कॅरेक्टर्स फारच प्रसिद्ध आणि लोकप्रिय होती. त्यांच्या कार्यासाठी त्यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

हे ही वाचा:

भारतीय यंदा या गोळ्यांच्या तालावर ‘डोलो’ लागले!

कोरोना काळात आयातीला ‘सोन्याचे दिवस’

पंजाब मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांकडे ईडीचे छापे

पंजाबमध्ये भगवंत मान ठरले ‘आप’ चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा

देबनाथ यांच्या जाण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. “श्री नारायण देबनाथजी यांनी आपल्या कलाकृती, व्यंगचित्रे आणि चित्रे यांच्या माध्यमातून अनेकांचे जीवन उजळून टाकले. त्यांनी केलेल्या कार्यामधून त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेचे दर्शन होते. त्यांनी निर्माण केलेल्या पात्रांची लोकप्रियता चिरंतन राहील. त्यांच्या निधनाने दुःख झाले आहे. त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांविषयी सहसंवेदना. ओम शांती!’’ असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे

Exit mobile version