यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील बंदि भागातील एकंबा गावातील इयत्ता सहावीत शिकणाऱ्या अनिकेत रवींद्र पांडे आणि दुसरीत शिकणाऱ्या सुदीप दीपक पांडेची सध्या राज्यभर चर्चा आहे. दोघांचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अनिकेत अवघ्या दोन मिनिटात विदर्भातील ११ जिल्हे आणि त्यातील १२० तालुक्यांची नावे भराभर सांगत आहे. तर सुदीप हा नद्या आणि त्यांची उगमस्थाने सांगत आहे. विशेष म्हणजे, दोघांनी न चुकता भराभर अशी नावे सांगितली.
जंगल भागातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या दोनही विद्यार्थ्यांचे अफाट ज्ञान बघून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. विद्यार्थ्यांचा व्हिडीओ मुख्यमंत्र्यांच्या हाती लागताच त्यांनी यवतमाळच्या जिल्हाधिकार्यांकडून माहिती घेत विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांचे व्हिडीओ शेअर करत ‘हे अस्सल हिरे’ असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्वीटकरत म्हटले, विदर्भातील ११ जिल्हे आणि त्यातील १२० तालुक्यांची नावे मुखोदगत असलेला सहावीत शिकणारा अनिकेत रवींद्र पांडे. नद्या आणि त्यांची उगमस्थाने सांगणारा, विभागश: जिल्ह्यांची नावे सांगणारा दुसरीतील सुदीप दीपक पांडे. अशी अनेक उदाहरणे अलिकडे माझ्या पाहण्यात आली. अभ्यासाव्यतिरिक्त सामान्य ज्ञानाचा हा पाठांतरक्रम थोडा वेगळा आणि मनाला सुखावणारा वाटला.
हे ही वाचा :
जयपूरमध्ये ५०० रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांना अटक
महाकुंभला विमानाने जाताय? आता भरा ५० हजार
छत्तीसगडमध्ये भाजपकडून चहा विक्रेत्याला महापौर पदाची उमेदवारी!
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणामागे पुनर्विकास प्रकल्प? मुलाच्या जबाबात कंबोज आणि अनिल परब यांचा उल्लेख
ते पुढे म्हणाले, सोशल मीडियावर अनेक व्हीडिओ माझ्या पाहण्यात आले. यवतमाळच्या जिल्हाधिकार्यांकडून मी माहिती घेतली. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, एकंबा, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ येथील हे विद्यार्थी आहेत. अविनाश नारवाडे त्यांचे शिक्षक आहेत, तर कल्याण बोबळे हे तेथे मुख्याध्यापक आहेत. समस्त शिक्षकवृंद आणि या प्रतिभाशाली विद्यार्थ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. ९०० लोकसंख्या असलेल्या या गावातील हे अस्सल हिरे आहेत. शिकत रहा आणि खूप मोठे व्हा. माझ्या शुभेच्छा कायम तुमच्यासोबत आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले. दरम्यान प्राथमिक शाळेचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून त्याला आता पाच कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
विदर्भातील 11 जिल्हे आणि त्यातील 120 तालुक्यांची नावे मुखोदगत असलेला सहावीत शिकणारा अनिकेत रवींद्र पांडे…
नद्या आणि त्यांची उगमस्थाने सांगणारा, विभागश: जिल्ह्यांची नावे सांगणारा दुसरीतील सुदीप दीपक पांडे…
अशी अनेक उदाहरणे अलिकडे माझ्या पाहण्यात आली. अभ्यासाव्यतिरिक्त सामान्य… pic.twitter.com/oJndv08cDI— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 28, 2025