इस्रायल-पॅलेस्टिनी मधील संघर्षात शनिवारी २०० हून अधिक इस्रायली आणि २३२ पॅलेस्टिनी ठार झाले.इस्रायली सुरक्षा दल आणि हमास गटाच्या सैनिकांमध्ये २२ ठिकाणी युद्ध सुरु आहे.यामध्ये इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी भाष्य केले,गाझाचा सगळा चेहरामोहरा आम्ही बदलून टाकू, असे म्हणाले आहेत.
हमास गटाकडून हवाई रॉकेट हल्ले,जमीन आणि सागरी आक्रमण सुरू केल्यानंतर, इस्रायलने देखील हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले यामध्ये ३०० हून अधिक इस्रायली आणि २३२ पॅलेस्टिनी ठार झाले आहेत.इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट म्हणाले,”आज, आम्ही वाईटाचा चेहरा पाहिला.महिला, मुले आणि वृद्ध यांच्यात भेद न करता हमासने एक गुन्हेगारी हल्ला केला.त्यांच्याकडून एक गंभीर चूक झाली आहे हे लवकरच त्यांच्या लक्षात येईल. आम्ही गाझा पट्टीतील सगळा चेहरामोहरा आम्ही बदलून टाकू, “इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी एका व्हिडिओ निवेदनात म्हटले आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देखील गाझामधील हमासचे किल्ले उद्ध्वस्त करण्याचे वचन दिले आहे. इस्रायल-पॅलेस्टिनी यांचा संघर्ष पूर्वी पासून आहे.१९७३ च्या अरब-इस्रायल युद्धाच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नेतन्याहू यांनी शनिवारी सकाळी, “इस्रायल आता युद्धात असल्याचे जाहीर केले.
हे ही वाचा:
भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनचे पहिले सुवर्ण
हमास दहशतवाद्यांच्या हल्ल्याला इस्रायलकडून एअर स्ट्राईकने उत्तर
‘विक्रम आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा सक्रिय होणार नाहीत’
हमास दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर इस्त्रायलमध्ये ‘स्टेट ऑफ वॉर’ घोषित
“मी गाझातील लोकांना सांगत आहे: आता तिथून निघून जा, कारण आम्ही आमच्या सर्व शक्तीने सर्वत्र कारवाई करणार आहोत,” ते पुढे म्हणाले. “आम्ही त्यांचा कटु अंत करू आणि त्यांनी इस्रायल आणि तेथील लोकांवर आणलेल्या या काळ्या दिवसाचा बळजबरीने बदला घेऊ.”
היום, ראינו את פני הרוע.
החמאס פתח בהתקפה נפשעת, ללא הבחנה בין נשים, ילדים וקשישים. הוא יבין מהר מאוד שעשה טעות חמורה.
אנחנו נשנה את פני המציאות ברצועת עזה עשרות שנים קדימה.
אזרחי ישראל, במיוחד בשעות קשות אלו, התאזרו בסבלנות וגבו את כוחות הביטחון. pic.twitter.com/psu4BOJg3w
— יואב גלנט – Yoav Gallant (@yoavgallant) October 7, 2023
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने रविवारी तातडीची बैठक नियोजित केली, या बैठकीत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिका सदैव इस्रायलच्या पाठिशी राहील, असे आश्वासन दिले आहे. तसेच, ‘या हल्ल्याचा इस्रायलच्या कोणत्याही शत्रूने गैरफायदा घेऊ नये,’ असा इशाराही दिला आहे.