पुढील हंगामात हार्दिकचे ‘एका सामन्याच्या बंदी’ने स्वागत!

पुढील हंगामात हार्दिकचे ‘एका सामन्याच्या बंदी’ने स्वागत!

आयपीएल २०२४ चा हंगाम हार्दिक पंड्यासाठी काही फळलेला नाही. या हंगामात पंड्याला अखेरपर्यंत सूरच गवसलेला नाही. या हंगामात पंड्या गुजरातहून मुंबई इंडियन्समध्ये परतला. मुंबई इंडियन्सच्या फ्रंचाईजने हार्दिकच्या गळ्यात मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची माळ घालण्यात आली. या निर्णयानंतर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी त्याला ट्रोलही केले. ट्रोल झाल्यानंतर ट्रोलर्सना पंड्या आपल्या खेळाने विरोधकांच्या दांड्या उडवून उत्तर देईल, असे वाटले होते. परंतु, पंड्या ना बॅटने ना बॉलने किंवा संघाच्या म्होरक्या म्हणून संघासाठी यशस्वी ठरू शकलेला नाही. त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने १४ सामन्यांपैकी १० सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यासोबत हार्दिकची वैयक्तिक कामगिरीनेही चाहत्यांची निराशा केली. हार्दिकचा एकंदर हा हंगाम अत्यंत निराशाजनक गेला आहे. त्यात आता भर म्हणून बीसीसीआयने हार्दिक पंड्याला पुढील हंगामातील (२०२५) पहिल्या सामन्यात बंदी घातली आहे.

मुंबईने आयपीएल २०२४ चा शेवटचा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध खेळला होता. शेवटचा सामना जिंकून मुंबईच्या चाहत्यांचा चेहऱ्यावर हसू येईल असे वाटले होते. त्यातही चाहत्यांच्या पदरी निराशा पडली. मुंबईचा लाजिरवाणा लखनौने पराभव केला. लखनौविरुद्धच्या या सामन्यात हार्दिक पंड्याला स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावण्यात आलेला आहे. हंगामातील स्लो ओव्हर रेटचा ही हार्दिकची तिसरी वेळ होती. त्यामुळे हार्दिकच्या चुकीला माफी नसल्यामुळे बीसीसीआयने त्याला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला आणि एका सामन्याची बंदी घातलेली आहे. हार्दिकवर पुढील हंगामातील पहिल्या सामन्यासाठी बंदी घालण्यात येणार आहे. हार्दिकसह संघातील इतर खेळाडूंना १२ लाख रुपये किंवा मॅच फीच्या ५० टक्के यापैकी जी रक्कम कमी असेल तो दंड आकारला जाणार आहे.

हेही वाचा :

निवडणूक वॉर रूम राडा प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

किर्गिस्तानमधील हिंसाचारात भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थी लक्ष्य

गाझामधून तीन ओलिसांचे मृतदेह ताब्यात

‘आप’मधील वातावरण ‘गैरवर्तन’, ‘गुंडगिरी’चे असून ‘ब्लॅकमेल संस्कृती’ने काम सुरू

पंत नंतर पंड्या बनला दुसरा कर्णधार

आयपीएल २०२४ मध्ये स्लो ओव्हर रेटमुळे एका सामन्याची बंदी घातलेला हार्दिक पंड्या हा दुसरा कर्णधार ठरलेला आहे. याआधी दिल्ली कॅपिटल्सची धुरा सांभाळणाऱ्या ऋषभ पंतलाही स्लो ओव्हर रेटमुळे एका सामन्याच्या बंदीला सामोरे जावे लागले होते. पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने तिसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटचा गुन्हा केला होता.

मुंबईची टुकार कामगिरी, संघ गुणतालिकेत तळागाळात

आयपीएल २०२४ मध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सची कामगिरी फारच टुकार होती. संघाने १४ सामन्यांपैकी फक्त ४ जिंकले आणि १० सामने गमावले. हा संघ ८ गुणांसह गुणतालिकेत तळाला म्हणजे दहाव्या स्थानावर आहे. २०२४ च्या हंगामात रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Exit mobile version