कॉमेडियन सुनील पाल यांच्या पाठोपाठ आता अभिनेता मुश्ताक खानचेही अपहरण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एका कार्यक्रमात बोलावण्याच्या बहाण्याने त्याचे अपहरण करण्यात आले होते. मुश्ताक खानचा बिझनेस पार्टनर शिवम यादवने याबाबत माहिती दिली.
शिवम यादव सांगितले की, २० नोव्हेंबरला मेरठमध्ये एका अवॉर्ड शोसाठी मुश्ताकला बोलावण्यात आले होते. दिल्ली विमातळावर उतरल्यानंतर त्यांना एका कारमध्ये बसवण्यात आले, जी त्यांना मेरठला घेवून जाणार होती. परंतु, ती कार दिल्लीच्या बाहेरील बाजूने, शक्यतो बिजनौरच्या दिशेने वळवण्यात आली.
अपहरणकर्त्यांनी मुश्ताक यांना १२ तास बंधक बनवले आणि त्यांच्याकडून १ कोटीची मागणी केली. जेव्हा ते संपूर्ण रक्कम देवू शकले नाही तेव्हा अपहरणकर्त्यांनी अभिनेता आणि त्याच्या मुलाच्या खात्यातून २ लाखांहून अधिक रुपये ट्रान्सफर करून घेतले.
हे ही वाचा :
“अध्यक्षांचा आदर करू शकत नसाल तर सभागृहाचे सदस्य राहण्याचा अधिकार नाही”
दिल्ली विधानसभेसाठी ‘आप’ची काँग्रेससोबत युती होण्याची शक्यता नाहीचं!
आरोपी बस चालकाला संतप्त नागरिकापासून असे वाचवले पोलिसांनी
ईव्हीएम मशिन आणि व्हीव्हीपॅट मोजणीमध्ये तफावत नाहीच
जेव्हा पहाट झाली तेव्हा अजानचा आवाज मुश्ताकच्या कानावर पडला, बाजूला मशीद असल्याचा अंदाज त्याने लावला. त्यानंतर संधी पाहून अभिनेत्याने तेथून पळ काढला आणि मशिदीतील लोकांची भेट घेत मदत मागितली. यानंतर पोलिसांच्या मदतीने अभिनेता सुखरूप मुंबईला पोहोचला.
शिवम यादव पुढे म्हणाले, यासंदर्भात आमचाकडे पुरावे आहेत. या प्रकरणी त्यांनी बिजनौरमध्ये एफआयआर दाखल केल्याची त्यांनी सांगितले. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दरम्यान, या घटनेची तुलना कॉमेडियन सुनील पाल यांच्या नुकत्याच झालेल्या अपहरणाशी केली जात आहे. दोन्ही घटनांमध्ये बरेच साम्य असून त्यामुळे या घटनांमागे संघटित टोळीचा हात असावा असा संशय निर्माण होतो. तसेच अभिनेता मुश्ताक सध्या ठीक आहेत, या घटनेवर लवकरच मिडीयाशी संवाद साधणार आहेत.