स्पर्धेदरम्यान वजन नियंत्रित करणे ही खेळाडूची आणि प्रशिक्षकाची जबाबदारी

आयओएच्या वैद्यकीय पथकावर करण्यात आलेल्या निष्काळजीपणाच्या आरोपानंतर पीटी उषा यांनी दिले स्पष्टीकरण

स्पर्धेदरम्यान वजन नियंत्रित करणे ही खेळाडूची आणि प्रशिक्षकाची जबाबदारी

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिच्याकडून पदकाची अपेक्षा असतानाचं तिला तिच्या अतिरिक्त वजनामुळे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील कुस्ती खेळाच्या अंतिम फेरीसाठी अपात्र ठरण्यात आले होते. या प्रकरणावर विनेश फोगाटने आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादामध्ये याचिका सादर केली होती. सध्या CAS मध्ये यावर सुनावणी सुरू असून त्यावर १३ ऑगस्ट रोजी निकाल दिला जाणार आहे. या संपूर्ण वादावर भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) अध्यक्षा पीटी उषा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

स्पर्धेदरम्यान वजन नियंत्रित करणे ही खेळाडूची आणि त्यांच्या प्रशिक्षकाची जबाबदारी असल्याचे आयओएच्या अध्यक्षा पीटी उषा यांनी म्हटले आहे. ५० किलो वजनी गट फ्री स्टाइल कुस्तीच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्याने विनेशला हिच्याकडून पदकाची खात्री होतीच परंतु, सामन्यापूर्वी १०० ग्रॅम जास्त वजनामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले. यानंतर विनेशने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत निवृत्तीची घोषणा केली होती. विनेश फोगटच्या अपात्रतेनंतर आयओएच्या वैद्यकीय पथकावर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला.

पीटी उषा म्हणाल्या की, “कुस्ती, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, ज्युडो यांसारख्या खेळांमध्ये खेळाडूंच्या वजन व्यवस्थापनाची जबाबदारी प्रत्येक खेळाडू आणि त्याच्या प्रशिक्षकावर असते. आयओएचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनशॉ पारडीवाला आणि त्यांच्या टीमवर नाही” त्या पुढे म्हणाल्या, “आयओए वैद्यकीय संघ, विशेषतः डॉ. पारडीवाला यांच्यावरील टीका अस्वीकार्य आणि निषेध करण्याजोगी आहे. कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी लोक सर्व बाजूंनी विचार करतील,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा..

उरण हत्याकांड प्रकरणात आणखी खुलासे होणार? यशश्रीचा मोबाईल पोलिसांच्या हाती

वक्फ कायद्यात सुधारणा नको, तो रद्दच करा!

‘माझ्या नादाला लागू नका’, माझा महाराष्ट्र सैनिक काय करेल हे कळणार नाही !

मनोज जरांगे स्वतः मुख्यमंत्री झाले तरी सगेसोयऱ्यांना आरक्षण देऊ शकत नाहीत !

पीटी उषा म्हणाल्या की, “पॅरिस ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक भारतीय खेळाडूला अशा खेळांमध्ये स्वतःची सपोर्ट टीम असते. जे अनेक वर्षांपासून खेळाडूंसोबत काम करत आहेत. आयओएने काही महिन्यांपूर्वी वैद्यकीय पथकाची नियुक्ती केली होती. ज्या खेळाडूंकडे न्यूट्रिशनिस्ट आणि फिजिओथेरपिस्टची स्वतःची टीम नाही, अशा खेळाडूंना मदत करण्यासाठीही ही टीम तयार करण्यात आली होती.”

Exit mobile version