आता दिगंबर जैन समाजाच्या मंदिरांमध्येही ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. सकल जैन समाजाने श्री दिगंबर जैन पंचायती मंदिर, झीरो रोड; ऋषभदेव तपोस्थली अंदावा, कटरा आणि बेनीगंज मंदिरांमध्ये जीन्स, जीन्स, हाफ पँट, फ्रॉक, कापलेले-फाटलेले कपडे, झगमग कपडे घालून येण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
महिला आणि मुलींना डोके झाकून मंदिरांमध्ये प्रवेश करण्याचे आवाहन मंदिर व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे. शालीन कपडे घालून येणाऱ्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. तसे फलक मंदिरांबाहेर लावण्यात आले आहेत. मंदिरामध्ये शालीन कपडे घालूनच प्रवेश करणे गरजेचे असून याची सुरुवात प्रयागराजपासून केली असल्याचे दिगंबर जैन समाजाचे मंत्री राजेश जैन यांनी म्हटले आहे. भाविकांनी डोके झाकूनच मंदिरांमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करावा तसेच, संपूर्ण काळे कपडे परिधान करू नये, असे आवाहन केले आहे. पाश्चात्य संस्कृतीपासून दूर राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
हे ही वाचा:
कुस्तीगीरांचे आंदोलन मागे, मात्र आता न्यायालयाची लढाई
दापोली हर्णे मार्गावरील अपघातात ८ ठार, नातेवाईकांना ५ लाख
‘बराक ओबामांमुळे सहा मुस्लिम राष्ट्रांवर बॉम्बहल्ला’
नियंत्रण रेषेजवळ पायाभूत सुविधा उभारायला चीनची पाकिस्तानला मदत
आचार्य विद्यासागर महाराजांनी सभ्य वस्त्र परिधान करणाऱ्यालाच मंदिरात प्रवेश करण्यास अनुमती द्यावी, असे निर्देश दिल्याचे कटरा येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर व्यवस्थापनाचे मंत्री अखिलेश चंद्र यांनी सांगितले. समाजाच्या व्हॉट्स ऍप ग्रुपवरही त्या संबंधीची सूचना देण्यात आली आहे. मनकामेश्वर मंदिरातही काही दिवसांपूर्वी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. महिला आणि तरुणींना छोटे तसेच, झगमग कपडे परिधान करून या मंदिरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक मंदिरांनी आता प्रवेशासाठी ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.